loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत रोटरी स्कूलच्या खेळाडूंची घवघवीत कामगिरी!

खेड : (प्रतिनिधी) - महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्या आयोजनातून दिनांक १३ व १४ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे झालेल्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल, खेडच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या स्पर्धेत शाळेच्या १४ वर्षांखालील मुलांच्या संघाने तसेच १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने सांघिक गटात तृतीय क्रमांक पटकावला. तसेच शाळेचा गुणवान खेळाडू अनय भोजने याने वैयक्तिक गटात प्रथम क्रमांक मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली. त्याचप्रमाणे श्रेयशी गायकवाड हिनेही वैयक्तिक गटात प्रथम क्रमांक मिळवून आपल्या खेळातील कौशल्याची चमक दाखवली. या दोन्ही खेळाडूंची आगामी विभागीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जिल्ह्यातील विविध खेळाडूंशी चुरशीच्या लढती देत अनय भोजने आणि श्रेयशी गायकवाड यांनी आपल्या जिद्दीच्या, चिकाटीच्या आणि उत्कृष्ट खेळाच्या जोरावर हे यश संपादन केले. त्यांच्या या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील प्रगतीला नवी दिशा मिळाली आहे. या यशस्वी खेळाडूंना शाळेचे क्रीडाशिक्षक गौरव आंब्रे व शितल घाणेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, सरावातील सातत्य आणि पालकांचे प्रोत्साहन महत्त्वपूर्ण ठरले. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे चेअरमन डॉ. उपेंद्र तलाठी, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिक भूमिता पटेल आणि शिक्षकवृंद यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन केले. आगामी विभागीय स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg