loader
Breaking News
Breaking News
Foto

राजधानी दिल्लीत विरोधी पक्ष खासदारांचा मोर्चा

नवी दिल्ली - विरोधी पक्षांच्या खासदारांनी आज (६ ऑॅक्टोबर) एकत्र येत राजधानी दिल्लीत निवडणुक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासाठी निवडणुक आयोग कार्यालयावर धडक मोर्चा काढला. त्यानंतर राष्ट्रपती महोदया द्रौपदी मूर्मू यांची भेट घेवून आपली भूमिका मांडण्याची घोषणा केली आहे. या मोर्चामुळे वातावरण तापले आहे. निवडणुक आयोगाच्या मुख्यालयाभोवती मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या आंदोलनादरम्यान अनेकांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षण प्रक्रियेवरून निवडणूक आयोग कचाट्यात सापडला असून आज मंगळवारी (६ ऑक्टोबर) विरोधी पक्षांच्या ’इंडिया’ आघाडीनं केंद्रीय निवडणूक आयोगावर मोर्चा काढला आहे. दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापासून साधारण १०० मीटर अंतरावर पोलीसांकडून हा मोर्चा अडवण्यात आला असून राहुल गांधींसहित विरोधी पक्षातील खासदारांनी अडवलेल्या जागीच ठिय्या दिला आहे. गेल्या तीन वर्षांपासून काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे निवडणूक आयोगाच्या कामकाजाच्या पद्धतीवर पुरावे देऊन टीका करत होते. ’इंडियन एक्सप्रेस’ या वृत्तपत्रानं केलेल्या इन्व्हेस्टीगेटीव्ह रिपोर्टनंतर राहुल गांधींच्या मुद्द्यांना एकप्रकारे बळकटी मिळालेली आहे. कॉक्रोच जनता पार्टी, डाव्या संघटना, एनएसयूआय आणि ठाकरे बंधूंनी केलेल्या आंदोलनानंतर आता सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येत हा मोर्चा काढला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg