loader
Breaking News
Breaking News
Foto

करजुवेत दुष्काळाचा सामना करण्यासाठी विद्यार्थ्यांनी बांधले दोन बंधारे

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. जिल्ह्यात सर्वत्र पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार आहे. या पार्श्वभूमीवर करजुवे ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून करजुवे पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकत्र येत श्रमदानातून दोन बंधारे बांधले. यामुळे भविष्यातील पाण्याचे संकट कमी होण्यास मदत होणार आहे. कावडी या ठिकाणी वाहून जाणारे पाणी आडवल्यामुळे आजूबाजूच्या, विहिरी व कुपनलिका यासह अन्य जलसाठ्याची पातळी वाढून व टिकून राहण्यास मदत होणार आहे. आनंददायी शनिवारी या उपक्रमातून या पाणी आडवा पाणी जिरवा याचे प्रत्यक्ष ज्ञान विध्यार्थ्यांना मिळाल्याची भावना त्यांच्या चेऱ्यावर दिसून आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या वेळी माजी सभापती सुभाष नलावडे, ग्रामसेवक विनायक जाधव, केंद्रप्रमुख हेमंत तांबे, रामराव बनसोडे, सचिदानंद शिर्के, विकास पवार, पराग खैर, सुनील केसरकर, विठोबा धावडे, किशोर धामापूरकर, श्रीधर नलावडे, मेघना नलावडे, सूरज माने, प्रमोद स्वामी, संतोष कासारे, सुरेश कुंभार, आदी ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ विध्यार्थी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg