रत्नागिरी : येथील सुप्रसिद्ध श्रीराम मंदिराचे प्रांगणातील श्री देवी तुळजाभवानी देवस्थानमध्ये नवरात्रोत्सवा निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम रोजच्या रोज सादर केले जात असून तुळजाभवानीची स्वहस्ते ओटी भरण्यासाठी काल दिवसभर भगिनींची रीघ लागली होती. पारंपारिक रिवाजानुसार श्री देवी तुळजाभवानीची प्रात:काळी षोडशोपचारपूर्वक पूजा, अभिषेक व आरती झाल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी व भगिनींना स्वहस्ते ओटी भरण्यासाठी खुले करण्यात आले.
ज्येष्ठ समाज नेते श्री. निलेश शांताराम लाड व त्यांच्या पत्नी सौ. अंकिता निलेश लाड या दांपत्याने यजमानपद भूषविले. सकाळी ‘उत्कर्ष महिला भजन मंडळ’, भाटीमिर्या यांचे सुश्राव्य भजन देवीच्या दरबारात सादर करण्यात आले. त्यानंतर राजश्री लोटणकर प्रस्तुत श्री देवी तुळजाभवानीचे स्तोत्राचे खड्या आवाजात पठण करण्यात आले. सायंकाळी सर्व उपस्थित भगिनींसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, त्याला भगिनींचा फार मोठा प्रतिसाद लाभला. त्यानंतर सायंकाळी ५ ते ७ या वेळेत कुमारिका पूजन हा पारंपारिक कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अनेक चिमुरड्या मुली नटुनथटून देवी तुळजाभवानीच्या दरबारात आल्या होत्या. तेथे उपस्थित असणार्या भगिनींनी या कुमारिकांचे पूजन केले. सर्वप्रथम त्यांचे पाय स्वच्छ पाण्याने धुवून ते पुसण्यात आले, त्यानंतर त्यांची ओवाळणी करण्यात आली आणि त्यांना गोड खाऊ व खेळणी भेट देण्यात आल्या.
आज शनि. दि. १७ ऑक्टो. रोजी देवीची पारंपारिक पूजा झाल्यावर ‘श्री स्वामी समर्थ महिला भजन मंडळ’ यांचे भजन देवीच्या दरबारात संपन्न होईल. यावेळी गायिका असतील सौ. मानसी साळवी, प्रेरणा विलणकर व वेदा शेट्ये. त्यानंतर सायंकाळी ५ ते ७ या वेळेत १) पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी व २) सौ. गोदूताई जांभेकर महिला विद्यालय, रत्नागिरी या २ प्रशालांच्या विद्यार्थिनी ‘कन्या मेळा’ चा लोकप्रिय कार्यक्रम सादर करतील. श्री तुळजाभवानी देवस्थानमध्ये नवरात्रोत्सवाला येणार्या सर्व भगिनींना देवीची स्वहस्ते ओटी भरण्याची संधी देण्यात येते. तसेच भगिनींच्या सोयीसाठी देवस्थानमध्ये नाममात्र किंमतीत ओटीची तबके तयार ठेवण्यात आलेली असतात. तरी सर्व भाविकांनी या नवरात्रोत्सवातील विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा तसेच समस्त भगिनींनी स्वहस्ते देवीची ओटी भरण्याची संधी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.