loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा तालुक्यात २५ नोव्हेंबरला जनतेच्या हक्काचे व्यासपीठ, कोरोनानंतर प्रथमच आमसभा

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - कोरोना महामारीच्या प्रदीर्घ काळानंतर लांजा तालुक्याची अत्यंत महत्त्वाची आमसभा येत्या २५ नोव्हेंबर रोजी आमदार किरण सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. सामान्य नागरिकांचे प्रश्न थेट प्रशासनासमोर मांडण्याचे आणि त्यांच्या हक्काचे हे व्यासपीठ मानले जाते. त्यामुळे या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गेल्या काही काळापासून तालुक्यातील अनेक विकास कामे प्रलंबित आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या आमसभेत प्रामुख्याने रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण आणि शेतकर्‍यांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी या सभेला उपस्थित राहणार असून, ते जनतेच्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत. त्यामुळे आमसभेत विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून प्रामुख्याने कोणत्या विषयावर चर्चा होणार याकडे लक्ष वेधले आहे. ज्यांना तक्रारी, सुचना, निवेदन मांडावयाच्या आहेत त्यानी २० नोव्हेंबरपर्यंत लेखी स्वरूपात पंचायत समिती कार्यालयात द्यावयाच्या आहेत.

टाईम्स स्पेशल

कोरोना निर्बंधांमुळे अनेक दिवस ही सभा होऊ शकली नव्हती, त्यामुळे नागरिकांमध्ये अनेक तक्रारी साचून राहिल्या आहेत. या आमसभेचे मुख्य फलित म्हणजे प्रशासन आणि जनता यांच्यात थेट संवाद साधला जाईल. केवळ चर्चा न होता, प्रलंबित विकास कामांना प्रत्यक्ष गती मिळेल आणि निधीचे योग्य नियोजन होईल, अशी अपेक्षा लांजा तालुक्यातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. या सभेला तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg