loader
Breaking News
Breaking News
Foto

ऐन दिवाळीच्या धामधूमीत महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई! कुप्रसिद्ध नक्षलवाद्याला डोंबिवलीतून उचलला

ठाणे - ऐन दिवाळीच्या धामधूमीत एटीएसने (Maharashtra ATS Action) ठाणे शहरात सर्वात मोठी कारवाई केली आहे. ठाणे एटीएसने झारखंडमधील कुप्रसिद्ध फरार नक्षलवाद्याला (Naxalite) अटक केली आहे. झारखंड सरकारने या नक्षलवाद्यावर 10 लाख रुपयांचं बक्षिस ठेवलं होतं. ठाणे एटीएसने डोंबिवलीजवळील ठाकुर्ली परिसरात ही कारवाई करत या नक्षलला अटक केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या माहितीनुसार हा व्यक्ती झारखंडमधील जंगल भागातील रहिवासी असून तो गेल्या 10 दिवसांपासून ठाकुर्लीमध्ये राहत होता. त्याला पकडून देणाऱ्यास १० लाख रुपयांचे बक्षीस झारखंड सरकारने जाहीर केले होते. अशातच एटीएस कारवाई करत त्याला अटक केली आहे. आज आरोपीला न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती आहे. तर अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्याचे नाव संजय सरोज यादव, ऊर्फ संजय गोडराय, ऊर्फ बुधराम असे असून त्याचे वय 45 वर्षे आहे. एटीएसच्या या कारवाईने परिसरात एकच खळबळ उडाली असून या नक्षलवाद्याचा घातपाताचा कट होता का, असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg