loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मजूर संस्थेला यांत्रिक आणि डांबरीकरणाची कामे, नियमबाह्य वाटपामुळे प्रत्यक्ष मजुरांच्या हक्कावर गदा

रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): स्थानिक मजुरांच्या हाताला काम मिळावे आणि त्यांच्या रोजगाराचे रक्षण व्हावे, या मुख्य उद्देशाने स्थापन झालेल्या एका संस्थेला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोट्यवधी रुपयांची यांत्रिक आणि डांबरीकरणाची कामे देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ज्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवजड यंत्रसामग्री आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतो, ती कामे मजूर संस्थेच्या घशात घालताना प्रशासनाने कोणत्या नियमांचा आधार घेतला, असा थेट प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. सार्वजनिक बांधकाम उत्तर विभाग, रत्नागिरीतर्फे या संस्थेला विविध टप्प्यांत लाखो आणि कोट्यवधी रुपयांची कामे मंजुरीचे आदेश (वर्क ऑर्डर) जारी करण्यात आले आहेत. नियमबाह्य वाटपामुळे प्रत्यक्ष मजुरांच्या हक्कांवर गदा येत असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यामध्ये देवरूख येथील तहसील इमारतीच्या गच्चीवर शेड उभारणी (रुपये २९,११,१०१.१३), जाकादेवी-खालगाव-राई-विल्ये-सोमेश्वर विद्यामंदिर रस्ता वार्षिक देखभाल (पहिला टप्पा रुपये १७,५१,४०८.११ व दुसरा टप्पा रुपये ३४,२२,९२१.७७), देवळे-मेघी-देवरूख रस्ता वार्षिक देखभाल (रुपये २८,७३,३१५.२५), तसेच तांबेडी-अंत्रवली-कळंबस्ते रस्ता व मासरांग शाखा रस्ता वार्षिक देखभाल (रुपये २४,६५,०६४.६६) या कामांचा समावेश आहे. याशिवाय, तळेकांटे-तुळसणी-देवरूख-मारळ-कळदरा रस्ता व मारळ-मार्लेश्वर शाखा रस्ता वार्षिक देखभाल (रुपये २४,८२,५०२.३१), ओरी येथील विष्णू आखाडे यांच्या घराजवळ आरसीसी गटार बांधकाम (रुपये ४,०९,७६३.००), पावस धनगरवाडी विठ्ठल मंदिर रस्त्याचे बळकटीकरण व डांबरीकरण (रुपये ४,१२,३८०.००), कुरतडे

टाईम्स स्पेशल

लोहारवाडी रस्त्याचे बळकटीकरण, डांबरीकरण व आरसीसी गटार बांधकाम (रुपये ८,२१,३९५.००) आणि गावडे आंबेरे खारवीवाडी-आंबेडकरवाडी येथे गटार बांधकाम (रुपये ४,१०,६१२.००) या कामांचाही समावेश आहे. या सर्व कामांची एकत्रित रक्कम सुमारे १ कोटी ७५ लाख ६० हजार ४६३ रुपये (रु. १,७५,६०,४६३.१३) एवढी होते. नियमानुसार मजूर संस्थांना श्रमावर आधारित आणि प्रत्यक्ष मजुरांकडून करून घेता येतील अशीच कामे देणे बंधनकारक असते. मात्र, डांबरीकरण, रस्ते बळकटीकरण व आरसीसी बांधकामासारखी मोठ्या प्रमाणावर जेसीबी, रोलर, कॉम्पॅक्टर व हॉपर यांसारख्या अवजड यंत्रांची गरज असणारी कामे एकाच मजूर संस्थेला बहाल करण्यात आल्याने या संपूर्ण प्रक्रियेवर संशयाची सुई फिरत आहे. या नियमबाह्य वाटपामुळे प्रत्यक्ष मजुरांच्या हक्कावर गदा आली असून, संबंधित यंत्रणेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg