loader
Breaking News
Breaking News
Foto

‘उबुंटू’च्या मानवतेच्या विचारातून रोटरॅक्ट क्लब ऑफ लोटेचा नवा सेवाप्रवास सुरू; अध्यक्षपदी मंदार दिवेकर, सचिवपदी अजिंक्य रोकडे

संगलट (प्रतिनिधी) - “मी आहे कारण आपण आहोत” अर्थातच एकमेकांच्या सहकार्याने, एकोप्याने आणि माणुसकीच्या भावनेतून समाजाची प्रगती साधणे, हा ‘उबुंटू’ (UBUNTU) या संकल्पनेचा मूळ विचार आहे. याच मानवतेच्या आणि सामूहिक सेवाभावाच्या विचाराला केंद्रस्थानी ठेवून रोटरॅक्ट क्लब ऑफ लोटेचा सन २०२६-२७ या वर्षाचा पदग्रहण सोहळा रविवार, दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी रोटरी विकास ट्रस्ट बिल्डिंग, पिरलोटे येथे उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून रोटा. मंदार अनंत दिवेकर, सचिव म्हणून रोटा. अजिंक्य दुर्गेश्वर रोकडे, तर खजिनदार म्हणून रोटा. आदित्य कळंबटे यांनी पदभार स्वीकारला. तसेच सन २०२६-२७ या वर्षासाठी संपूर्ण बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनेही आपल्या पदाची जबाबदारी स्वीकारली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाला इन्स्टॉलिंग ऑफिसर म्हणून माजी असिस्टंट गव्हर्नर रोटे. पद्माकर सुतार उपस्थित होते. यावेळी रोटरी क्लबच्या अध्यक्ष रोटे. सोनाली रहाटे, इनरव्हिल क्लबच्या अध्यक्ष इन. श्रावणी सुर्वे, रोटरॅक्ट झेडआरआर रोटा. मनीष वाडकर तसेच घाणेखुंट गावचे सरपंच व आरसीसी प्रतिनिधी रोटे. संतोष (राजू) ठसाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 'उबुंटू’ ही केवळ एक थीम नसून ती माणुसकी, परस्पर सहकार्य, एकता, समानता आणि सामूहिक जबाबदारी यांचा संदेश देणारी जीवनशैली आहे. व्यक्तीपेक्षा समूहाचे महत्त्व आणि स्वतःच्या प्रगतीसोबत इतरांच्या प्रगतीचाही विचार करण्याची शिकवण या संकल्पनेतून मिळते. याच विचारांच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांपर्यंत पोहोचणे, शैक्षणिक, सामाजिक आणि सेवाभावी उपक्रम राबवणे तसेच प्रत्येकाला सोबत घेऊन पुढे जाण्याचा संकल्प नूतन कार्यकारिणीने व्यक्त केला.

टाईम्स स्पेशल

यावेळी मान्यवरांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून आगामी वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. मावळते अध्यक्ष रोटा. शुभम अनंत काते व मावळते सचिव रोटा. विराज खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. “Together in Service, United in Humanity” या ब्रीदवाक्याला ‘उबुंटू’च्या विचारांची जोड देत रोटरॅक्ट क्लब ऑफ लोटेने नव्या वर्षात एकत्रितपणे समाजसेवेचा वसा पुढे नेण्याचा निर्धार केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg