loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रीय ज्युनियर ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी रोटरी स्कूलच्या वेदांग चितळकर याची निवड

खेड - (प्रतिनिधी) - एस. व्ही. जे. सी. टी. डेरवण येथे रविवार, दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या ॲथलेटिक्स स्पर्धेत रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलच्या इयत्ता 10 वीमध्ये शिकणाऱ्या वेदांग चितळकर याने 60 मीटर धावण्याच्या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. त्याने अवघ्या 7.62 सेकंदांत 60 मीटर अंतर पूर्ण करून विक्रमी वेळेची नोंद केली. वेदांगने आपल्या मेहनतीच्या, जिद्दीच्या आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर धावण्याच्या स्पर्धेत आपली गुणवत्ता सिद्ध केली. या स्पर्धेत त्याने जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले. त्याच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वेदांग चितळकर याची रत्नागिरी जिल्हा संघातून NIDJAM राष्ट्रीय आंतर-जिल्हा ज्युनियर ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही राष्ट्रीय स्पर्धा हैदराबाद, तेलंगणा येथे दिनांक 14 ते 16 नोव्हेंबर 2026 या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेत तो रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. वेदांगला शीतल घाणेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन डॉ. उपेंद्र तलाठी, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी वेदांगच्या या यशाबद्दल त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg