loader
Breaking News
Breaking News
Foto

मुरुगवाडा येथे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचा सन्मान, सेवा पंधरवड्याला उत्स्फूर्त सुरुवात

रत्नागिरी : आपल्या भारत देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि सर्वोच्च पदावरती सलग २५ वर्षाचा अभूतपूर्व कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल संपूर्ण देशामध्ये सेवा पंधरवड्याचे आयोजन केले जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षाताई ढेकणे, शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या सहकार्याने मुरुगवाडा येथील अंगणवाडी क्र. ०१ मधील सेविका तन्वी नागेश कांबळे, मदतनीस रिद्धी नितीन नागवेकर आणि अंगणवाडी क्र ०२ सेविका प्रांजल प्रकाश गुरव, मदतनीस अश्विनी जयेंद्र चोगले यांना शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प, मिठाई आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी प्रमुख पाहुणे निवृत्त सेना अधिकारी मिलिंद नागवेकर, महिला शहराध्यक्ष भक्तीताई दळी, सरचिटणीस निलेश आखाडे, शेखर लेले, आशिष मोरे, मोहन पटवर्धन, नाना पिलणकर, दिलीप भोळे, शहर सचिव मंदिरा भोळे, शोभाताई जिरोळे, विजय मालवदे, मंदार भोळे आणि मुरुगवाडा येथील लाभार्थी महिला उपस्थित होत्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg