loader
Breaking News
Breaking News
Foto

आसगे येथील एकनाथ मांडवकर यांचे निधन

केळंबे-लांजा (वार्ताहर) - लांजा तालुक्यातील आसगे येथील एकनाथ काशिराम मांडवकर (वय ६०) यांचे शुक्रवार २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने आसगे गावासह लांजा तालुका आणि मुंबईतील त्यांच्या समाजबांधवांमध्ये शोककळा पसरली आहे. मांडवकर हे कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा तालुका लांजाचे विद्यमान उपाध्यक्ष होते. तसेच नवयुग सेवा मंडळ, मुंबई (मांडवकरवाडी, आसगेचे) त्यांनी सलग ३० वर्षे अध्यक्षपद भूषविले. तर लोककला बहुरंगी नमन मंडळ, लांजा यांचे ते प्रमुख आधारस्तंभ होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले. बहुरंगी नमन या कोकणच्या लोककलेच्या जतनासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. समाजातील प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जाणारे, निःस्वार्थी आणि समाजाभिमुख नेतृत्व म्हणून ते परिचित होते. त्याच्या पश्चात वडील, दोन भाऊ, पत्नी, दोन मुलगे, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg