खेड (प्रतिनिधी) - कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा तालुका खेडच्या वतीने आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ‘विद्यार्थी गुणगौरव सोहळा २०२६’ रविवार दिनांक २५ ऑक्टोंबर २०२६ रोजी सह्याद्री स्कूल, भांडुप पश्चिम, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाला सुरुवात करताना दीप प्रज्ज्वलन, प्रतिमांना पुष्पहार घालून, स्वर्गीय समाज नेत्यांना, सभासद व समाजबांधव यांना भावपुर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य स्तरावर यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करून त्यांच्यात स्पर्धात्मक भावना आणि प्रोत्साहन निर्माण करण्याच्या उद्देशाने या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शाखा अध्यक्ष शंकर बाईत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास संघ निरीक्षक, संघ उपाध्यक्ष तथा खेड तालुका पालक मंत्री उदय कठे व संघ कार्यकारणी सदस्य नवनीत पिंपरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमादरम्यान मार्गदर्शन करताना शाखा अध्यक्ष शंकर बाईत यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व समाजाच्या प्रगतीमध्ये आणि उन्नतीमध्ये आजच्या विद्यार्थ्यांचे आणि युवा पिढीचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. विद्यार्थ्याना प्रोत्साहन देण्यासाठी भविष्यात असे कार्यक्रम होत राहतील असे त्यांनी सांगितले. खेड तालुका पालक मंत्री, संघ उपाध्यक्ष उदय कठे यांनी सांगितले की, आजची तरुण पिढी आणि विद्यार्थी वर्ग हाच समाजाचा खरा पाया आहे. म्हणूनच, अशा गुणगौरव सोहळ्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हे समाज प्रगतीसाठी अत्यंत गरजेचे आहे. संघ कार्यकारणी सदस्य नवनीत पिंपरे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व समारंभातून इतर विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन नेत्रदीपक कामगिरी करावी, असे त्यांनी सांगितले. नितीन खापरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले पाहिजे. आपण कोणी विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील आणि त्यांना पुस्तकांची गरज असेल तर माझ्या मार्फत मोफत पुस्तके पुरवेन. असा समाज शाखेनीही प्रयत्न करायला हवा. तरच अधिकारी घडतील. असे त्यांनी सांगितले.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला संघ प्रतिनिधी मंगेश मांडवकर, उपाध्यक्ष प्रकाश गोटल, जयवंत वामने, उप सेक्रेटरी रुपेश तांबट, हिशोब तपासणी संजय जाधव, कार्यकारणी सदस्य, राजाराम निकम, विलास कावणकर, युवा अध्यक्ष प्रवीण शिबे, युवा सेक्रेटरी अँड कल्पेश बांद्रे, युवा खजिनदार शैलेश शिगवण, उपाध्यक्ष गणेश झुजम, उपसेक्रेटरी शिरीष कदम, रोहित भाईजे, तसेच समाज बांधव, विद्यार्थी, पालक वर्ग उपास्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाखा सचिव संदीप दोडेकर यांनी अत्यंत कुशलतेने केले, तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष प्रकाश गोठल यांनी मानले. उपस्थितांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा वार्षिक सोहळा संस्मरणीय ठरला.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.