loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीत पाइपलाइनच्या खोदकामामुळे रस्ते खराब; रस्ते पूर्ववत करण्याची नागरिकांची मागणी

सावंतवाडी (प्रतिनिधी): सावंतवाडी नगरपरिषद क्षेत्रात गॅस पाइपलाइन आणि पाणी पुरवठा योजनेच्या पाइपलाइन टाकण्याचे काम एकाच वेळी सुरू करण्यात आले होते. मात्र, रस्त्याच्या दुतर्फा केलेल्या खोदकामामुळे आणि साईड पट्टी खराब झाल्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवरून वाहन चालवताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या खोदकामामुळे रस्त्यांची दुर्दशा झाली असून, खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होण्यासोबतच वाहनधारकांना पाठीच्या व कंबरदुखीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पावसाळा संपल्याने आता रस्ते लवकरात लवकर पूर्ववत करावेत, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नगरपरिषदेकडून मिळालेल्या माहितीनुसार, गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण झाले असले, तरी पाणी पुरवठा योजनेची पाइपलाइन टाकण्याचे काम अजूनही अपूर्ण आहे. शहरातील काही भागांत साईड पट्टीची दुरुस्ती करण्यात आली असली, तरी सालईवाडा मिलाग्रिस चर्च परिसरातील रस्ता दुतर्फा खोदकामामुळे अत्यंत खराब स्थितीत आहे. याशिवाय शहरातील मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. पाणी पुरवठा योजनेचे काम अपूर्ण राहिल्याने या योजनेला मुदतवाढ देण्याबाबत येत्या २३ ऑक्टोबर रोजी होणार्‍या बैठकीत चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

टाईम्स स्पेशल

सावंतवाडी शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. पावसाळ्यात रस्त्यांची कामे करणे शक्य नव्हते. आता गॅस पाइपलाइनचे काम पूर्ण झालेल्या ठिकाणी रस्ते पूर्ववत करण्याला प्राधान्य दिले जाईल. तसेच पाणी पुरवठा पाइपलाइनचे काम अद्याप सुरू असून, या कामाच्या मुदतवाढीबाबत येत्या २३ ऑक्टोबरच्या बैठकीत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे नगराध्यक्षा‡ सौ. श्रद्धा राजे भोसले यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg