loader
Breaking News
Breaking News
Foto

बौद्ध धम्म राजे आणि सम्राटाची देणगी आहे - संजय कदम

रत्नागिरी : दि. 20 ऑक्टोबर 2026 रोजी अशोका विजयादशमी व 70 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन असल्याने सकाळी 11वाजता कुवारबाव ठिकाणी अशोक पवार यांचे अध्यक्षतेखाली शहरानजीकचे नाचणे, कुवारबाव बौध्दजन पंचायत समिती शाखा क्र.34चे वतीने साजरा करणेत आला. त्यावेळी बोळताना आयु. संजय कदम म्हणाले की, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मचक्र पुन्हा गतीमान करून जो बौध्द धम्म दिला आहे तो राजे आणि सम्राटाची मोल्यवान देणगी आहे. सिध्दार्थ गौतम हे राजपुत्र होते त्यानी राजवैभवाचा त्याग करून महान साधनेतून ज्ञान प्राप्ती करून जो धम्म(शिकवणूक) दिली ती अखंड मानव जातीच्या उध्दारासाठी जिवन जगणेचा सन्मार्ग आहे. त्यासाठी त्यांना सुखाच्या मार्गाचा त्याग करावा लागला. इतिहासात जे जे महान झालेत त्यांनी त्याग, समर्पण केल्यामुळेच महान झाले आहेत. त्यानंतर अनेक राज्यानी त्यांचा धम्म स्विकारलेला आहे. सम्राट अशोकाने कलिंगचे युध्द जिंकुन विजय मिळविला पण जिवितहानी पाहुन तोही व्यतिथ झाला. आणि त्यांनीही शेवटी शस्त्र खाली ठेवून तथागताचा बौध्द धम्म स्विकारला. चंड अशोकाने त्यावेळी आपल्यातील अवगुण काढून सत्गुणाचा स्विकार केला तो दिवस अशोका विजया दशमीचा दिवस होय.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पुढे सम्राट अशोकाने बौद्ध धम्माचे प्रचार प्रसारासाठी मुलगी संघमित्रा मुलगा महेंद्र यांना भारताबाहेर धम्माचा प्रचार करणेस पाठविले. त्यामुळे अनेक देशात बौध्द धम्म पोहचला. आज काही देशाचा तो प्रमुख धम्म झाला आहे. भारतात सम्राट अशोकाने 84 हजार स्तूप, स्तंभ, लेणी कोरलेली व बनविलेले आहेत. यांच अशोका विजया दशमीचे दिवसी भारतात पुन्हा एकदा भिमराजाने म्हणजेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी धम्मचक्र पुन्हा गतिमान करून आज 70 वर्ष झाली आहेत. त्यांचा आनंद उत्सव आज आपण अशोका विजया दशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा करत आहोत. हा धम्म महान राजे आणि सम्राटाचा धम्म आपल्याला देवून मुक्तपणे जगण्याचा सन्मार्ग दिला आहे. त्यांचबरोबर भारतीय समाजाला आपली प्रगती साधनेसाठी समता, स्वातंत्र्य, बंधूभाव आणि न्यायासाठी संविधान दिले आहे. त्यामुळेच देशाची प्रगती होते आहे. लोकशाहीत पुन्हा राजे बनणेसाठी संविधानात मताचा आधिकार देणेत आला आहे. तोच धोक्यात येत आहे की काय?असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टाईम्स स्पेशल

त्यापुढे ते म्हणाले की, सम्राट अशोकाच्या धम्मक्रातीतून निर्माण झालेले पुरातन वस्तू, स्तूप, स्तंभ, लेणी पुरातन विहारे ही भारतीय संविधानाने राष्ट्रीय स्मारके, स्थाने, बनली आहेत. त्याचे संरक्षण भारतीय संविधान कलम 49 अनन्वे केद्र व राज्य सरकारणे संरक्षण करणेची तरतूद धम्मदिक्षेच्या आधिच 1950 लाच करणेत आली आहे आणि 14 ऑक्टोबर 1956 रोजी अशोक विजया दशमीच्या दिनी बुध्दाच्या धम्माची दिक्षा घेतली व अनुयायाना दिली आहे. तथपूर्वी आयु. वसंत साळवी यांनी धम्माबाबत उत्तम मार्गदर्शन करताना शिल, समाधी, करुणा, पंचशील, आर्य अष्टागिक मार्ग या विषयी भाष्य केले. सम्यक हातखबेकर, मृग़्दा काबळे यांची मनोगते झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक पवार यानी ही मोलाचे मार्गदर्शन केले. त्यावेळी ते म्हणाले की, आजची प्रगती ही महामानवाची देणगी आहे. ती विसरता कामा नये. कार्यक्रमाचे सुरवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक पवार व महिला प्रतिनिधी मृग़्धा काबळे यांचे हस्ते तथागत गौतम बुध्द, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे प्रतिमाना हार अर्पण, दिप प्रज्वलन करून सामुदायिक वंदनेने कार्यक्रमाची सुरूवात करणेत येवून शाखेचे सेक्रेटरी आयु. अमित पवार यांनी प्रस्तावना व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करणेस शाखेचे मनिष काबळे, सम्यक हातखबेकर, मंगेश काबळे आदींनी सहकार्य केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg