loader
Breaking News
Breaking News
Foto

घोटगे-येळपईवाडी येथे तालुकास्तरीय वनराई बंधारा शुभारंभ उत्साहात, भूजल पातळी वाढविण्यासाठी कच्चे बंधारे उभारण्याचे आवाहन

साटेली भेडशी (प्रतिनिधी) - पावसाळ्यातील पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्यासोबतच भूजल पातळी वाढविण्यासाठी वनराई बंधारे उपयुक्त ठरत असून, प्रत्येक गावाने या उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याची गरज आहे, असे आवाहन घोटगे-येळपईवाडी येथे करण्यात आले. ग्रामपंचायत घोटगे-येळपईवाडी आणि पंचायत समिती दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, ३० सप्टेंबर २०२६ रोजी तालुकास्तरीय वनराई बंधारा शुभारंभ कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी कच्चे बंधारे उभारून पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविणे आणि त्याचा जास्तीत जास्त साठा भूगर्भात करण्याचे महत्त्व उपस्थितांनी अधोरेखित केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमास दोडामार्ग पंचायत समिती सभापती पार्वती गवस, उपसभापती गणेशप्रसाद गवस, जि.प. सदस्य दीपक गवस, श्वेता धर्णे, शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख प्रेमानंद देसाई, पदाधिकारी संजय गवस, रामदास मेस्त्री, राकेश धर्णे, पंचायत समिती सदस्य संजय सातार्डेकर, घोटगे सरपंच भक्ती दळवी, उपसरपंच विजय दळवी, भाजपा कार्यकर्ते सूर्यकांत धर्णेसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

वनराई बंधार्‍यांमुळे पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरण्यास मदत होते. परिणामी परिसरातील विहिरी, विंधनविहिरी तसेच अन्य पाणीस्रोतांची भूजल पातळी वाढण्यास हातभार लागतो. शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढण्याबरोबरच भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठीही हा उपक्रम महत्त्वाचा ठरू शकतो, असे उपस्थितांनी सांगितले. तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रातील योग्य ठिकाणी वनराई अथवा कच्चे बंधारे उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि लोकसहभागातून हा उपक्रम व्यापक करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. घोटगे-येळपईवाडी येथे झालेल्या या तालुकास्तरीय उपक्रमाचे ग्रामस्थ व शेतकर्‍यांनी स्वागत केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg