loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबव पोंक्षे गावात पाणी अडवण्यासाठी महिलांचा पुढाकार, भुवडवाडीतील महिलांचा उपक्रम

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - भविष्यात येणारी पाणी टंचाई, वेळीच लक्ष्यात घेत, कुणी येईल आणि बांधरा बांधून देईल अशी वाट न पाहता संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे गावातील भुवड वाडीतील महिलांनी पुढे येत स्वतः बंधारा बांधला आहे. महिलांनी स्वतःहून केलेल्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आंबव पोंक्षे ग्रामपंचायतीचे सरपंच शेखर उकार्डे व अन्य सदस्यांचे देखील मार्गदर्शन लाभले. पाणी पातळी सध्या झपाट्याने खाली कमी होत आहे. दरवर्षी जानेवारी फेब्रुवारी पर्यंत वाहणारे ओढे आत्ताच आटायला लागले आहेत. अगदी कमी पाणी ओढ्यातून वाहत असल्याचे गावीगावी लक्ष्यात आल्यावर बंधारे बांधण्यास सुरवात झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आंबव पोंक्षेतील भुवडवाडी महिला मंडळाने देखील आपल्या वाडीलगत असलेल्या ओढ्याला बंधारा घातला आहे. जेणेकरुन नजिकच असलेल्या विहिरीची पाणी पातळी टिकून राहील. वाहून जाणारे पाणी अडल्याने, आजूबाजूच्या विहिरीत व कुपनलिकांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झालेली नेहमीच पाहायला मिळते. महिलांनी घेतलेल्या पुढाकाराने एक वेगळा आदर्श निर्माण झाला आहे. आंबव पोंक्षे गावात प्रत्येक ओढ्यावर वनराई बंधारे घालण्याचे काम हाती घेत असल्याचे सरपंच शेखर उकार्डे यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg