loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री. विजय पाटणकर यांचे सुपुत्र श्री. विशाल, स्नुषा सौ. सृष्टी या आर्किटेक्ट दांपत्याकडे नामवंत संस्थांचे प्रकल्प

रत्नागिरी : रत्नागिरीतील प्रथितयश वास्तू विशारद श्री. विजय पाटणकर यांचे चिरंजीव श्री. विशाल विजय पाटणकर व स्नुषा सौ. सृष्टी विशाल पाटणकर या आर्किटेक्ट दांपत्याने रत्नागिरीत शहर व परिसरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात नामवंत आर्किटेक्ट म्हणून उत्तम नावलौकीक संपादन केला असून त्यांच्याकडे जिल्ह्यातील अनेक प्रतिष्ठाप्राप्त संस्थांची कामे सुपूर्द करण्यात आली आहेत.श्री. विजय पाटणकर हे जिल्ह्यातील एक नामवंत व बुजुर्ग आर्किटेक्ट म्हणून सुपरिचीत आहेत. त्यांनी जिल्ह्यातील अनेक प्रकल्प पूर्णत्वास नेले. त्यांचे चिरंजीव श्री. विशाल विजय पाटणकर व स्नुषा सौ. सृष्टी विशाल पाटणकर हे आर्किटेक्ट दांपत्य त्यांचा वारसा पुढे चालवित आहे. श्री. विशाल पाटणकर यांचे शिक्षण रत्नागिरीतील कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये तर पुढील शिक्षण गोगटे कॉलेजमध्ये झाले. त्यांनी पुणे विद्यापीठाची बी. आर्च. ही आर्किटेक्टमधील पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून पदव्युत्तर एम.आर्च.अर्बन डिझाईन ही पदवी देखील संपादन केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

केवळ पदवी प्राप्त करुन ते थांबले नाहीत तर राजधानी दिल्लीत त्यांनी ६ महिने इंटर्नशीप केली व देशपातळीवरील अनुभव मिळवला. त्यानंतर त्यांनी मुंबईत नामवंत आर्किटेक्ट सोबत कार्य करुन या क्षेत्रातील अत्याधुनिक ज्ञान संपादन केले. त्यांनी मुंबई मेट्रोमध्ये देखील इंटर्नशीप केली. त्या क्षेत्रातील गाढा अनुभव प्राप्त केल्यानंतर ते रत्नागिरी येथे दाखल झाले व आपले वडील श्री. विजय पाटणकर यांच्यासोबत त्यांनी प्रॅक्टीस चालू केली. त्यांच्या सौभाग्यवती सौ. सृष्टी विशाल पाटणकर या देखील आर्किटेक्ट आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठातून बी. आर्च. पदवी संपादन केली आहे. श्री. विशाल पाटणकर व सौ. सृष्टी पाटणकर या पाटणकर दांपत्याकडे केवळ रत्नागिरीतीलच नव्हे तर जिल्ह्यातील अनेक प्रतिष्ठाप्राप्त संस्थांचे प्रकल्प सोपविण्यात आले आहेत.

टाइम्स स्पेशल

नरेंद्र महाराज संस्थानचे नियोजित कॉलेज, आरएसएस श्री. गोळवलकर गुरुजी स्मारक, स्वगृही सेवा संस्था वृद्धाश्रमाची भव्य वास्तू, गुहागर येथील व्याडेश्‍वर देवस्थानचे भक्तनिवास, चित्पावन ब्राह्मण संघाची रत्नागिरीतील नियोजित वास्तू, हॉस्पिटल्स, बिल्डींग कमर्शिअल रेसिडेन्सी, बिल्डींग रेसिडेन्शिअल, बंगलोज, इंटेरियर प्रोजेक्ट अशा अनेक प्रकल्पांवर ते या घडीला कार्य करीत आहेत. श्री. विजय पाटणकर यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले असून श्री. विशाल पाटणकर व सौ. सृष्टी पाटणकर या दांपत्याने अल्प काळात आर्किटेक्चर क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे.त्यांचा मोबाईल क्र. 8830313228 असा आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg