loader
Breaking News
Breaking News
Foto

कुडासे हायस्कूलच्या सुचित्रा गोंधळीची महाराष्ट्र शालेय साॅफ्टबाॅल संघात निवड

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगांव आयोजित राज्यस्तरिय शालेय साॅफ्टबाॅल अंजिक्यपद स्पर्धा व राज्य निवड चाचणीतून धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित सरस्वती विद्यामंदिर व ज्युनि. काॅलेज आॅफ सायन्स, कुडासे ता.दोडामार्ग जि.सिंधुदुर्ग प्रशालेतील विद्यार्थीनी सुचित्रा सोमनाथ गोंधळी हिची चंदीगढ(पंजाब) येथे संपन्न होणार्‍या राष्ट्रीय शालेय साॅफ्टबाॅल स्पर्धाकरिता महाराष्ट्र राज्याच्या 19 वर्षाखालील मुलीच्या संघात निवड झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कुडासे सारख्या ग्रामीण भागातील या प्रशालेतील आता पर्यत 27 राष्ट्रीय तर 110 राज्यस्तरीय खेळाडू घडले आहेत. संस्था अध्यक्षा कल्पनाताई तोरसकर, कार्याध्यक्ष डाॅ.मिलिंद तोरसकर, सचिव संतोष सावंत, खजिनदार वैभव नाईक, समन्वय समिती सचिव रश्मीताई तोरसकर, सहसचिव नंदकुमार नाईक, मुख्याध्यापक जालिंदर शेंडगे, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, शालेय समिती सदस्य, पालक शिक्षक संघ, माजी विद्यार्थी संघ, कुडासे पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांंनी सुचित्राचे अभिनंदन केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg