loader
Breaking News
Breaking News
Foto

सेवाभावी डॉक्टर मयुरेश मोरेश्वर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या आई कालिका मंदिर मिरजोळे येथे मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

रत्नागिरी (प्रतिनिधी): मिरजोळे रत्नागिरी येथे मोफत नेत्र तपासणी व मोफत नेत्रबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन उद्या करण्यात आले आहे, या स्तुत्य उपक्रमाचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे. मिरजोळे गावातील सेवाभावी डॉक्टर मयुरेश मोरेश्वर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आई कालिका देवी नवरात्र उत्सव मिरजोळे व लायन्स आय हॉस्पिटल रत्नागिरी तसेच श्री लक्ष्मी क्लीनिक डॉक्टर गायत्री मयुरेश पाटील महादेव नगर मिरजोळे रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने लोक उपयुक्त असे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिरजोळे गावातील जनतेसाठी उपयुक्त असे हे शिबिर असून मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर याशिवाय मोफत ब्लड प्रेशर, मधुमेह तपासणी व सल्ला देण्यात येणार आहे तरी मिरजोळे गावातील जनतेने या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संदेश, शुभानंद, डॉक्टर मयुरेश पाटील, विकास, प्रितेश यांनी केले आहे. सदरचे शिबिर रविवार दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी १० ते ०२ दोन वाजेपर्यंत आई कालिका मंदिर सभागृह मिरजोळे रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

अधिक माहितीसाठी ७९७२०५९६५४, ९११९४४११५५,७७५८९७८७५,९९७५३४५६२३, डॉक्टर मयुरेश- ७९७७७७०८२८ येथे संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg