loader
Breaking News
Breaking News
Foto

बोरगाव ग्रामपंचायतचे सरपंच व मनसेचे गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर यांना आदर्श सरपंच पुरस्कारासाठी निवड

वरवेली (गणेश किर्वे) - महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त, भारत सरकार सूक्ष्म, लघु एवं मध्यम उद्यम मंत्रालय या विभागात नोंदणीकृत संस्था, महाराष्ट्र राज्य अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र ग्राम विकास परिषद, पुणे(महाराष्ट्र राज्य) या संस्थेच्या वतीने बोरगाव ता. चिपळूण ग्रामपंचायतचे सरपंच व मनसेचे गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र ग्रामरत्न पुरस्कार 2026 आदर्श सरपंच पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बोरगाव ग्रामपंचायतचे सरपंच सुनील हळदणकर यांनी गावाच्या विकासासाठी, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेले उल्लेखनीय काम व योगदान यांची दखल घेऊन आपली महाराष्ट्र ग्रामरत्न पुरस्कार २०२६ या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या राज्यस्तरीय होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात येणार आहे. दि.१५ नोव्हेंबर रोजी पुणे (महाराष्ट्र) येथे करण्यात येणार आहे. या निवडीचे पत्र डॉ. दिपक दादाराव जाधव (संस्थापक अध्यक्ष, टॅलेंटकट्टा) यांनी दिले आहे. त्यांची पुरस्कारासाठी निवड झाल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg