loader
Breaking News
Breaking News
Foto

वेरळ जि. प. शाळेत मद्यधुंद तरुणाचा शिक्षकांवर हल्ला; धक्काबुक्की व शिवीगाळप्रकरणी गुन्हा दाखल

लांजा (संजय साळवी) - मद्यप्राशन करून शाळेत आलेल्या एका व्यक्तीने दोन शिक्षकांशी वाद घालत त्यांची कॉलर पकडून शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याची घटना तालुक्यातील वेरळ येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत मंगळवारी ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी गावातीलच एका ३८ वर्षीय तरुणावर लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबतची फिर्याद नंदकुमार बळीराम भागवत (५३ वर्षे, शिक्षक वेरळ मराठी शाळा, रा. लांजा, धावणेवाडी, ता. लांजा) यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी सायंकाळी नंदकुमार भागवत हे दैनंदिन रजिस्टर भरण्याचे शासकीय काम करीत असताना कुणाल शांताराम कुर्णेकर (३८ वर्षे, रा. वेरळ गायदडीवाडी, ता. लांजा) हा मद्यप्राशन करून शाळेत आला. त्यानंतर त्याने शिक्षक नंदकुमार भागवत यांच्या डाव्या कानावर थोपटाने मारून तसेच सहशिक्षक यांना यांच्या शर्टाची कॉलर पकडून शिवीगाळ केली. तसेच भागवत यांना देखील शर्ट पकडून धकलाबुकल केली.

टाईम्स स्पेशल

अशाप्रकारे शासकीय कामात अडथळा आणला म्हणून कुणाल शांताराम कुर्णेकर याच्यावर भारतीय न्याय संहिता १३२, १३१, १२१ (१), ३५२, ३५१ (२), महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ८५ (१) (२), प्रमाणे भा. दं. वि. कलम ३५३, ३५२, ३३२, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड. कॉन्स्टे. विलास जाधव हे करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg