loader
Breaking News
Breaking News
Foto

वरवेली (गणेश किर्वे) - महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागरच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा ‘नवदुर्गा सन्मान’ करून स्त्रीशक्तीचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शृंगारतळी येथील मनसे संपर्क कार्यालय मध्ये गुहागर तालुक्यातील जानवळे गावातील आशा सेविका यांचा सन्मान सोहळा पार पडला. जानवळे गावातील आशा सेविका विजया विजय शिंदे व अमृता अंकुश जानवळकर या आरोग्य विभागामध्ये समाजोपयोगी कार्य करत असतात. स्वतःच्या संसाराचा गाडा सांभाळून त्या गावाच्या विकासासाठी, महिलांच्या प्रगतीसाठी आणि गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. अशा महिलांच्या कार्याला सार्वजनिक व्यासपीठ मिळणे अत्यंत गरजेचे असल्याने त्यांचा मनसेच्या वतीने आम्ही समान करत असल्याचे मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आशा सेविकांचे गावाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करणे ही आमची नैतिक जबाबदारी असून नवदुर्गा सन्मानातून महिलांना नवी प्रेरणा मिळणार असल्याचे माजी उपसरपंच तथा सदस्य ग्रामपंचायत जानवळे वैभवी विनोद जानवळकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष विनोद गणेश जानवळकर, शुंगारतळी शहराध्यक्ष वेदांत देवळेकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपविभाग अध्यक्ष प्रवीण (पिंट्या) संसारे, सांस्कृतिक विभाग अध्यक्ष राहुल जाधव, मंगेश धामणस्कर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg