loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीतील प्रभाग क्रमांक पाचच्या नगरसेविका पूजा पवार आयोजित नवरात्रनिमित्त देवी दर्शन उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

रत्नागिरी : रत्नागिरीतील प्रभाग क्रमांक पाचच्या नगरसेविका पूजा दीपक पवार यांनी सालाबादप्रमाणे यावर्षीही प्रभागातील भाविक महिलांसाठी नवरात्रनिमित्त दिनांक १२ आणि १३ ऑक्टोबर रोजी मोफत देवी दर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. देवी दर्शन कार्यक्रमाला प्रभागातील महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. नगरसेविका पूजा पवार यांच्या या उपक्रमाचे प्रभाग पाचमधील महिलांकडून कौतुक होत आहे. दरवर्षी नवरात्रामध्ये प्रभाग क्रमांक पाचच्या महिलांमध्ये आकर्षण असते, देवी दर्शन सहलीचे! घरगुती अडचणी आणि वाहनांची गैरसोय यांमुळे अनेकदा भाविक महिलाना मनातील बेत रद्द करावा लागतो. मनात कितीही इच्छा असली तरी प्रत्येक महिलेला या ना त्या कारणाने देवी दर्शन घडतेच असे नाही. महिलांच्या मनातील ती देवी दर्शनाची इच्छा हेरून गेली पाच वर्षे पूजा पवार याच महिलांसाठी देवी दर्शन सहलीचे आयोजन करत आहेत. या सहलीमुळे प्रभागातील सर्व महिलांची एकमेकांशी ओळख होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत आणि लांजा राजापूर विधानसभा आमदार किरण सामंत आणि नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली या सहलीत महिलांना भगवती, महालक्ष्मी, जुगाई, आदिष्टी आणि आडीवरेची महाकाली असे शक्तीपिठाचे दर्शन घडविण्यात आहे. दोन्ही दिवशी सकाळी १० वाजता बाळासाहेब ठाकरे ॲक्टिव्हिटी सेंटर, साळवी स्टॉप इथून त्यासाठी एसी बस सोडण्यात आली. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नगरसेवक बंड्या साळवी यांच्या हस्ते या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

या सहलीला प्रभाग क्रमांक पाच मधील महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. महिलांना देवी दर्शन चांगल्या पद्धतीने व्हावे असा प्रामाणिक प्रयत्न नगरसेविका पूजा पवार यांनी केला. या महिलाना गाडी करून देणे, त्यांच्या नाश्त्याची सोय करणे या आवश्यक बाबींवर पूजा पवार जातीने लक्ष देत होत्या. याचमुळे प्रभागातील महिलांना देवीदर्शन सुविधा निर्माण झाली. नगरसेविका पूजा पवार यांच्या या उपक्रमाचे प्रभाग पाचमधील महिलांकडून कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg