loader
Breaking News
Breaking News
Foto

मुणगे येथील भगवती वाचनालयामध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा

देवगड (प्रतिनिधी) - मुणगे येथील भगवती वाचनालयामध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. माजी राष्ट्रपती भारतरत्न स्व.डॉ.ए.पी. जे अब्दुल कलाम यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून " वाचन प्रेरणा दिन " साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनास वाचकावर्गातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माजी राष्ट्रपती स्व.डॉ. ए.पी. जे अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने दि.१५ आँक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस " वाचन प्रेरणा दिन " म्हणून साजरा करून शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण करण्यासाठी व वाचनाची आवड वृध्दीगत करण्याच्या दृष्टीने साजरा करण्या बाबतचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्या अनुषंगाने श्री भगवती वाचनालयामध्ये डॉ .ए.पी. जे अब्दुल कलाम यांच्या फोटो प्रतिमेस वाचनालयाचे अध्यक्ष गोविंद सावंत उपाध्यक्ष महादेव ऊर्फ तात्या प्रभू उज्ज्वला महाजन यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमाचे औचित्य साधून सन् २०२६-२७ या आर्थिक वर्षात खरेदी करण्यात आलेल्या नवीन ग्रंथांचे ग्रंथप्रदर्शन अयोजित करण्यात आले होते. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष गोविंद सावंत, उपाध्यक्ष महादेव प्रभू, उज्ज्वला महाजन, सुनील बोरकर, मोतीराम ऊर्फ दादा वळंजु, तसेच वाचनालयाचे कर्मचारी व वाचक उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वानी डॉ अब्दूल कलाम यांच्या फोटो प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यानंतर सन् २०२६-२७ या आर्थिक वर्षात नवीन खरेदी केलेल्या ग्रथांचे ग्रंथप्रदर्शन भरविण्यात आले होते. या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन वाचनलयाचे अध्यक्ष गोविंद सावंत व उपाध्यक्ष महादेव ऊर्फ तात्या प्रभू यांचे हस्ते झाले. यावेळी उज्ज्वला महाजन, सुनिल बोरकर, मोतीराम ऊर्फ दादा वळंजु, वाचनालयाचे ग्रंथपाल विश्वास मुणगेकर, सोमनाथ रुपे, मुणगेकर, महेश प्रभू आदीं वाचक उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

या ग्रंथप्रदर्शनामध्ये कादंबरी, कथासग्रह, नाटक, बालवाचक वर्गासाठी लहान पुस्तके, कविता संग्रह, अध्यात्मिक ग्रंथ, स्पर्धापरिक्षा पुस्तके, आदी पुस्तकांचा सहभाग होता. ग्रंथप्रदर्शन संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ठेवण्यात आले होते. या ग्रंथप्रदर्शनाचा लाभ वाचकानी घेतला. यावेळी वाचनालयाच्या कार्यकारीनी सदस्या उज्ज्वला आनंद महाजन यानी वाचनालयासाठी पाच हजाराची देणगी दिली. याबद्दल वाचनालयाचे अध्यक्ष व कार्यकारीनी सदस्य यानी उज्जला महाजन यांचे आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg