loader
Breaking News
Breaking News
Foto

निकालानंतर भाजपा आणि शिवसेनेमध्ये मोठा संघर्ष, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आढावा घेणार

मुंबई - आज विधान परिषदेच्या ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदार संघाचा निकाला हाती येईल. १८ तासांपेक्षाही अधिक काळापासून मतमोजणी सुरु आहे. या निकालाकडे राज्याच्या नजरा लागून राहिल्या आहेत. मात्र जे निकाला हाती आले आहेत त्यावरुन भाजपा आणि शिवसेना पक्षात मोठा संघर्ष उभा राहिला आहे. रविंद्र धंगेकर यांनी तर थेट नेतृत्व बदलाची मागणी केली आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे पाहिजेत असे ते म्हणाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पुणे पदवीधरमध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर तर नागरपूर शिक्षक मतदार संघात नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, गडचिरोली या जिल्ह्यातील निवडणुकी दरम्यान घडामोडीचा भारतीय जनता पार्टी आढावा घेणार आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण अ‍ॅक्शन मोडवर आले असून त्यांनी नागपूर व पुणे जिल्ह्याचा लेखाजोखा मागितला आहे. जिल्हाध्यक्ष, स्थानिक आमदार, मंत्री यांना थेट त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. भाजपाच्या काही पदाधिकार्‍यांचे राजीनामेही घेण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

टाईम्स स्पेशल

२ नोव्हेंबर रोजी केंद्रिय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात येत असून महायुतीतील मित्रपक्षांनी घेतलेल्या भूमिकेबाबत ते शहांसमोर अहवाल सादर करणार आहेत. भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी अपयशाचे खापर शिंदेंच्या शिवसेनेवर फोडले आहे. नागपूर विधानसभा मतदारसंघात मतपत्रिकांवर सुधाकर कोहळे यांच्या नावासमोर २ आकडा लिहल्याने ९ हजार मते अवैध ठरली, तिथेच घात झाला. नागपूरच्या निकालाबाबत फडणवीसांना देखील धक्का बसला असून भाजपाच्या बालेकिल्लयात काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी यांचा बोलबाला दिसून येतोय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विजयी उमेदवारांमागे महाविकास आघाडीचे घटक पक्ष ठाम उभे राहिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg