रत्नागिरी (जमीर खलफे) : महायुतीमधील घटक पक्षांमध्ये समन्वय राहणे अत्यंत गरजेचे असून, युतीमध्ये कोणतीही दुफळी किंवा दरी निर्माण होणार नाही आणि विरोधकांना त्याचा फायदा घेण्याची संधी मिळणार नाही, याची काळजी सर्वच नेत्यांनी घेतली पाहिजे, असे स्पष्ट मत राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे. रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी जिल्ह्यातील श्रेयवादापासून ते राज्यातील अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडींवर सविस्तर भाष्य केले. मंडणगड नळपाणी योजनेच्या श्रेयवादावरून सुरू असलेल्या चर्चेवर बोलताना उदय सामंत यांनी सामंजस्याची भूमिका घेतली. खासदार सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि महायुतीतील महत्त्वाचे नेते आहेत, तर आम्ही देखील महायुतीचाच एक भाग म्हणून काम करत आहोत. त्यामुळे महायुतीतील सर्वच नेत्यांनी एकमेकांशी समन्वय साधून काम करावे, जेणेकरून विरोधकांना टीका करण्याची संधी मिळणार नाही, असे त्यांनी नमूद केले. शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारले असता सामंत यांनी सावध पवित्रा घेतला. रामदास कदम हे आमच्याच पक्षाचे नेते आहेत, मात्र त्यांनी मला विचारून पत्रकार परिषद घेतलेली नाही. त्यांच्याकडे नेमकी काय माहिती किंवा कोणते पुरावे आहेत, याची मला कल्पना नाही. परंतु, महायुतीमध्ये काम करताना सर्वांनी एकत्रितपणे पुढे गेले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.
तसेच, प्रदेश पातळीवर महायुतीतील नेत्यांकडून होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांवर भाष्य करण्याइतका मी मोठा नेता नसून, मी केवळ रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या राजकीय भानगडीत मी न पडलेलेच बरे, असे म्हणत त्यांनी वादापासून दूर राहणे पसंत केले. अजित पवार यांच्या अपघाताच्या मुद्द्यावर बोलताना सामंत यांनी पारदर्शकतेची मागणी केली. अजित पवार यांचा तो निव्वळ अपघात होता की त्यामागे काही घातपात होता, याचे सत्य जनतेसमोर आलेच पाहिजे, अशी आमची प्रामाणिक भावना आहे. विधानसभेतही आम्ही ही मागणी लावून धरली असून, या प्रकरणात 'दूध का दूध आणि पाणी का पाणी' झाले पाहिजे, असे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर सामंत यांनी जोरदार टोलेबाजी केली. दोन महिन्यांपूर्वी सुनील तटकरे हे विलीनीकरण होणार नाही असे सांगत होते, तर आता १२ फेब्रुवारीला विलीनीकरण होईल असे सांगत आहेत. या विषयावर जसे सुनील तटकरे संभ्रमात आहेत, तसाच संभ्रम माझ्या मनात आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात आहे. हा त्या दोन्ही पक्षांचा अंतर्गत प्रश्न असून, यावर शरद पवार किंवा सुनेत्रा पवार हेच नेमके उत्तर देऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
सुप्रिया सुळे यांच्या दिल्ली दौऱ्यावर बोलताना ते म्हणाले की, हल्ली कोणी कोणालाही भेटले की त्याचा लगेच राजकीय अर्थ काढला जातो. मी मध्यंतरी एका शैक्षणिक संस्थेच्या कामासाठी शरद पवार यांची भेट घेतली होती, तरीही त्याला राजकीय रंग दिला गेला. राजकारणापलीकडे काही वैयक्तिक संबंधही असतात, हे समजून घेतले पाहिजे. राज्यात पुन्हा कोणताही राजकीय भूकंप होण्याची शक्यता सामंत यांनी फेटाळून लावली. चार वर्षांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऐतिहासिक राजकीय भूकंप घडवून आणला होता, मात्र सध्या महाराष्ट्रात तसे कोणतेही चित्र किंवा शक्यता दिसत नाही, असे ते म्हणाले. केंद्रातील आणि राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, जे पक्ष चालवतात तेच नेते याबाबत निर्णय घेऊ शकतात. सध्या तरी आमच्या पक्षात किंवा महायुतीमध्ये विस्ताराबाबत कोणत्याही हालचाली नाहीत. आगामी हिवाळी अधिवेशनाबाबत बोलताना, गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही अत्यंत विधायक पद्धतीने अधिवेशन चालवत आलो आहोत, आता या अधिवेशनात विरोधक कामकाज सुरळीत चालू देतात की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल, असेही उदय सामंत यांनी शेवटी नमूद केले.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.