loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय येथे रक्तदान शिबीर

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग व ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग व नगरपंचायत दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर घेण्यात आले. सेवा संकल्प अभियान मार्फत सर्व रुग्णांना आरोग्य सेवा मिळावी व त्याचा लाभ प्रत्येक कुटुंबापर्यंत मिळावा यासाठी आरोग्य विभागाने वेळोवेळी पुढाकार घेऊन हे कार्यक्रम यशस्वी केले. समाजातील गरजू रुग्णांना जीवनदान देणे, रक्ताची कमतरता दूर करून आरोग्यसेवा मजबूत करणे यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी ग्रामीण रुग्णालय दोडामार्गचे वैद्यकीय अधीक्षक डॉ नित्यानंद मसुरकर, भगवान गवस, रुग्ण कल्याण समिति सभासद बाबूराव धुरी, डॉ. रामदास रेडकर, डॉ. समिर धाकोरकरर, श्रीमती सुरेखा भणगे सिस्टर, समुपदेशक सचिन मोहिते उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg