रत्नागिरी (जमीर खलफे) : मुंबई विद्यापीठाच्या आंतरविभागीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन आज गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या बॅडमिंटन कोर्ट येथे विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे जिमखाना प्रमुख डॉ. चंद्रशेखर केळकर, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या स्पर्धेत पात्रता फेरीतून आलेले महिला, पुरुषांचे आठ संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धा दोन दिवस चालणार आहे. उद्घाटनावेळी कबड्डी (पुरुष) निवड समिती अध्यक्ष डॉ. चंद्रकांत म्हात्रे, सदस्य निलेश शिंदे व कुलभूषण कुलकर्णी, महिला कबड्डी निवड समिती अध्यक्ष चंद्रकांत नाईक, सदस्य सुहास जोशी व सूर्यकांत ठाकूर, कोकण विभाग क्रीडा समितीचे सचिव शशांक उपशेटे, महाविद्यालयाचे पहिले कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू पराग सुर्वे, शास्त्र शाखा उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. विवेक भिडे, महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे उपस्थित होते. या कार्यक्रमात संघांसोबत आलेल्या सर्व प्रशिक्षक व संघ व्यवस्थापकांचे स्वागत करण्यात आले.
या वेळी डॉ. रेड्डी यांनी सांगितले की, गेल्या वर्षी आपल्या विद्यापीठ कबड्डीच्या महिला, पुरुष संघाचा दर्जा चांगला राहिलेला आहे. बऱ्याच वर्षानंतर अखिल भारतीय स्पर्धेसाठी आपण पात्र ठरलो. विद्यापीठाचा संघ चांगला झाला पाहिजे यासाठी प्रशिक्षक, सराव शिबिराचे आयोजन करत आहोत. यातील विद्यार्थ्यांना कुठे ना कुठे नोकरी उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे गांभिर्याने याकडे लक्ष द्या. हा एक सांघिक खेळ असल्याने सर्वांनी चांगला खेळ करा. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या व सांगितले की, कबड्डी हा मातीशी नाते सांगणारा खेळ आहे. पण ही स्पर्धा मॅटवर होणार आहे. प्रो- कबड्डीमुळे या खेळाकडे खेळाडू आकर्षित होत आहेत. प्रतिस्पर्ध्याला आव्हान देताना समन्वयातून खेळ रंगतो. गोगटे जोगळेकर महाविद्यालयात क्रीडा स्पर्धांना कायम प्रोत्साहन दिले जाते. महाविद्यालयाच्या पाच विद्यार्थ्यांना शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे, ही अभिमानास्पद गोष्ट आहे. या वेळी प्रा. साक्षी चाळके यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. विनोद शिंदे यांनी आभार मानले.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.