loader
Breaking News
Breaking News
Foto

डिचोलीत २९ नोव्हेंबरला शिवसंस्कार व स्वराज्य संस्थेतर्फे भव्य सत्कार सोहळा; सुप्रसिद्ध सिनेअभिनेते अजय पूरकर यांची विशेष उपस्थिती

सावंतवाडी (प्रतिनिधी) : मातृभूमी शिक्षण संस्था संचलित शिवसंस्कार आणि डिचोली येथील स्वराज्य संगीत सांस्कृतिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २९ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता डिचोली येथे भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्याला नाट्य रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग सावंतवाडी येथील शिवसंस्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ. सोनल लेले यांनी केले आहे. सावंतवाडी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होते. यावेळी कार्याध्यक्ष गणेश ठाकूर, शिवसंस्कार सावंतवाडी तालुका अध्यक्ष अभिजीत राऊळ, उपाध्यक्ष कृष्णा करमळकर, प्रज्ञा मातोंडकर, केतकी म्हापसेकर, प्रीता राऊळ, अभिजीत चौककर आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

डिचोली गोवा येथील हिराबाई झांट्ये मेमोरियल हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार असून, या सोहळ्याला गोवा आणि महाराष्ट्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गोवा राज्याचे कला व सांस्कृतिक मंत्री रमेश तवडकर, डिचोली मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि शिवसंस्कारचे गोवा राज्यप्रमुख मंदार गावडे उपस्थित राहणार आहेत. तर विशेष उपस्थिती म्हणून सुप्रसिद्ध सिनेअभिनेते अजय पूरकर यांची उपस्थिती हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. या सोहळ्यात शिवसंस्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ. सोनल लेले, कार्याध्यक्ष गणेश ठाकूर, गोवा उपाध्यक्ष नितीन नाईक, कार्यदर्शी सहखजिनदार ॲड. सोनू गावस, संयोजक रामकृष्ण दळवी, सावंतवाडी अध्यक्ष अभिजीत राऊळ, सावंतवाडी उपाध्यक्ष कृष्णा कर्मळकर, सावंतवाडी संयोजक सौ. प्रज्ञा मातोंडकर, दोडामार्ग प्रमुख संध्या प्रसादी आणि संयोजक पापुराज मयेकर यांच्या पुढाकारातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमाला ऐतिहासिक नाट्यकलेचीही विशेष जोड मिळणार आहे. शिवगणेश प्रोडक्शन, सिंधुदुर्ग (मुंबई) निर्मित, प्रा. वसंत कानेटकर लिखित आणि गणेश ठाकूर दिग्दर्शित अजरामर ऐतिहासिक नाटकाची मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे. त्यामुळे कला, संस्कृती, इतिहास आणि सामाजिक कार्याचा गौरव करणारा हा सोहळा ठरणार आहे. शिवसंस्कार संस्थेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांचा, इतिहासाचा व संस्कारांचा प्रसार करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्याच सामाजिक व सांस्कृतिक कार्याचा भाग म्हणून या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. डिचोलीसह सावंतवाडी, दोडामार्ग आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवप्रेमी, नाट्यरसिक, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते तसेच नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मातृभूमी शिक्षण संस्था संचलित शिवसंस्कार सावंतवाडी व स्वरगंध संगीत सांस्कृतिक संस्था डिचोली गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजकांच्या वतीने करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg