loader
Breaking News
Breaking News
Foto

हेवाळे बुद्धविहारात धम्मचक्र प्रवर्तन दिन व वर्षावास समारोप उत्साहात

साटेली भेडशी (प्रतिनिधी) : तथागत गौतम बुद्धांच्या समतेच्या विचारांचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीचा जागर करीत हेवाळे येथील बुद्धविहारात धम्मचक्र प्रवर्तन दिन व वर्षावास समारोप कार्यक्रम उत्साहात पार पडला. भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा दोडामार्ग आणि गाव शाखा हेवाळे यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रमाकांत जाधव आणि भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा दोडामार्गचे अध्यक्ष बुद्धभूषण हेवाळकर यांनी धम्मचळवळ, सामाजिक एकजूट आणि परिवर्तनाच्या विचारांवर प्रभावी मार्गदर्शन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बाबासाहेबांनी दिलेल्या धम्मातून माणसाला प्रतिष्ठेने जगण्याची आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची वैचारिक ताकद मिळते. सामाजिक परिवर्तनासाठी विविध संघटनांनी आपापसांतील मतभेद बाजूला ठेवून समाजाच्या विकासासाठी एकजुटीने काम करावे. धम्मचळवळ केवळ कार्यक्रमांपुरती मर्यादित राहू नये : बुद्धांचे विचार प्रत्यक्ष आचरणात आणून सामाजिक जागृती, शैक्षणिक प्रगती आणि संविधानिक मूल्यांचा प्रसार करावा. तरुण पिढीला वैचारिक वारसा द्यावा : युवकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, स्वाभिमान, सामाजिक बांधिलकी आणि धम्मविचारांची जाणीव निर्माण करावी. बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित समाजनिर्मिती करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे. संघटनात्मक एकजूट हीच धम्मचळवळीची खरी ताकद असून, भगवान बुद्धांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन समताधिष्ठित समाज घडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जाधव यांनी केले.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष जाधव होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ, मुंबईचे दोडामार्ग तालुका अध्यक्ष तथा संबोधी बहुउद्देशीय तालुका संस्थेचे अध्यक्ष शंकर जाधव, सचिव संदीप जाधव, भारतीय बौद्ध महासभेचे सचिव भिवा आयनोडकर, माजी मुख्याध्यापक विलास कासकर, श्रामणेर अर्जुन कदम, गाव शाखा अध्यक्ष संतोष जाधव, तसेच उदय जाधव, अभय पाटकर, उत्तम कदम आदी मान्यवर उपस्थित होते. शंकर जाधव, संदीप जाधव आणि विलास कासकर यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आभार श्रामणेर अर्जुन कदम यांनी मानले. बुद्धांचे विचार, बाबासाहेबांचे संविधान आणि संघटनात्मक एकजूट यांच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाची चळवळ अधिक बळकट करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg