loader
Breaking News
Breaking News
Foto

वडवली येथे जागतिक जेष्ठ नागरीक दिन उत्साहात साजरा

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - राजापूर तालुक्यातील वडवली लोकसंसद संस्थेच्यावतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन वडवली गावात मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला गावातील अनेक ज्येष्ठ नागरिक तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच प्रणिता प्रमोद शिंदे आणि डॉ. विकास आंब्रे, आरोग्य सेवक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जेष्ठ नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करून त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच त्यांच्या चेहर्‍यावर आनंद फुलवण्यासाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांनी या खेळांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg