loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबडवे येथे भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची भेट व अभिवादन!

मंडणगड (प्रतिनिधी) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळगावी मंडणगड तालुक्यातील आंबडवे येथे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. या भेटीच्या माध्यमातून महापुरुषांच्या विचारांप्रती आदर व्यक्त करत सामाजिक समता, बंधुता आणि एकात्मतेचा संदेश देण्यात आला. यावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष मंगेश मोहिते आणि जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांच्यासह ओबीसी मोर्चा, उत्तर रत्नागिरीचे जिल्हा उपाध्यक्ष गणपत गावकर, तसेच सुनील मोहिते, कृष्णा मोहिते, अशोक मोहिते, दीपक मोहिते आणि विजय मांडवकर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महापुरुषांनी समाजाला दिलेला समता, न्याय, बंधुता आणि मानवतेचा विचार आजही समाजाला योग्य दिशा दाखवणारा आहे. या विचारांचे आचरण आणि प्रसार करून समाजातील विविध घटकांमध्ये एकोपा निर्माण करणे, सामाजिक सलोखा वाढविणे आणि परस्परांतील बंधुभाव अधिक दृढ करणे ही काळाची गरज आहे, अशी भावना या भेटीतून व्यक्त करण्यात आली. महापुरुषांच्या विचारांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून सामाजिक बांधिलकी जपणे, समाजहितासाठी सातत्याने कार्यरत राहणे आणि समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी योगदान देणे, हा संदेश या भेटीच्या माध्यमातून देण्यात आला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg