संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - गणेशोत्सव म्हणजे केवळ दहा दिवसांचा उत्सव नव्हे, तर श्रद्धा, संस्कृती आणि माणसांना जोडणारा सोहळा… हीच भावना गेली ६५ वर्षे देवरुखमध्ये जपली जात आहे. सन १९६१ पासून सुरू असलेला देवरुखचा २१ दिवसांचा गणेशोत्सव आजही तितक्याच उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा होत असून, देवरुखचा राजा पोलीस बॉईज मित्र मंडळाने या परंपरेला आधुनिक नियोजनाची जोड देत उत्सवाची भव्यता कायम ठेवली आहे. देवरुखमधील हनुमान मंदिरात गणपती बाप्पाची स्थापना केली जाते. बाप्पाच्या आगमनापासून ते विसर्जना पर्यंत मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण अनुभवायला मिळते. सकाळ- संध्याकाळ होणाऱ्या आरत्या, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी आणि परिसरात घुमणारा ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष यामुळे देवरुखचे वातावरण अक्षरशः गणेशमय होते.
या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे २१ दिवस विनामूल्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन. विविध कला, मनोरंजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळते. त्यामुळे गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा न राहता कला आणि संस्कृतीचा उत्सव बनतो. या उत्सवामागे केवळ मंडळाचे कार्यकर्ते नसून देवरुखमधील अनेक मंडळे, संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांचे सहकार्य असते. एकमेकांच्या सहकार्याने हा उत्सव यशस्वी करण्याची परंपराच देवरुखमध्ये निर्माण झाली आहे. उत्सवात सहकार्य करणाऱ्या विविध मंडळांचा मंडळाच्या वतीने सन्मान करून त्यांच्या योगदानाची दखल घेतली जाते. बाप्पाच्या आरतीचा मान मिळणे हीदेखील अनेकांसाठी भावनिक आणि अभिमानाची बाब ठरते. विविध क्षेत्रांतील व्यक्तींना आरतीचा मान दिला जात असल्याने या माध्यमातून समाजातील विविध घटकांना बाप्पाच्या चरणी एकत्र आणले जाते.
या २१ दिवसांच्या उत्सवात सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह विविध क्षेत्रांतील नागरिक बाप्पाच्या दर्शनासाठी आवर्जून उपस्थित राहतात. मात्र बाप्पाच्या दरबारात पद, प्रतिष्ठा किंवा क्षेत्राचा भेद राहत नाही; प्रत्येक भक्तासाठी बाप्पाच्या चरणी समान स्थान असते, हीच या उत्सवाची खरी ताकद आहे.आजच्या धावपळीच्या काळात अनेक पारंपरिक उत्सवांचे स्वरूप बदलत असताना १९६१ पासून सुरू असलेली २१ दिवसांची ही गणेशोत्सवाची परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे, ही देवरुखकरांसाठी अभिमानाची बाब आहे. अनेक पिढ्या या उत्सवाशी जोडल्या गेल्या आणि प्रत्येक पिढीने आपल्या परीने या परंपरेत नवा रंग भरला. बाप्पाची भक्ती, संस्कृतीचा जागर, कलाकारांना व्यासपीठ, सामाजिक बांधिलकी आणि सर्वांना एकत्र आणणारी भावना—या सगळ्यांचा सुंदर संगम म्हणजे देवरुखचा राजा पोलीस बॉईज मित्र मंडळाचा २१ दिवसांचा गणेशोत्सव! ६५ वर्षांची ही परंपरा केवळ सुरू नाही, तर प्रत्येक वर्षी नव्या उत्साहाने पुढे जात आहे… आणि म्हणूनच देवरुखच्या गणेशोत्सवात बाप्पासोबतच परंपरेचेही दर्शन घडते.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.