loader
Breaking News
Breaking News
Foto

सुकिवली जिल्हा परिषद गटात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहिमेला गती; मिशन बंधारे उपक्रम सुरू

खेड (प्रतिनिधी) : सुकिवली जिल्हा परिषद गटातील पुरे, कळंबणी खुर्द आणि विहाळी परिसरात निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेऊन भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ‘मिशन बंधारे’ अंतर्गत ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा जलसंधारण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने बंधारे उभारून पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविणे, जमिनीत पाण्याचा अधिकाधिक साठा निर्माण करणे आणि भूजलपातळी वाढविणे, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते. मात्र, हेच पाणी योग्य पद्धतीने अडवून जमिनीत जिरविल्यास त्याचा उपयोग पुढील काळात पिण्याच्या पाण्यासह शेती आणि दैनंदिन गरजांसाठी होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर सुकिवली जिल्हा परिषद गटातील संबंधित गावांमध्ये जलसंधारणाच्या कामांना महत्त्व देण्यात येत आहे. स्थानिक पातळीवर बंधारे उभारण्याच्या माध्यमातून पाण्याचा अपव्यय रोखणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करणे, यावर या उपक्रमात भर दिला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उपक्रमावेळी खेड तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे, पंचायत समिती सदस्य महेंद्र भोसले, महेश मोरे, ग्रामीण संपर्कप्रमुख अनिल भोसले, युवासेना तालुकाप्रमुख मिलिंद काते, आंबवली ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय यादव यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, युवासैनिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg