देवगड (प्रतिनिधी) - देवगड तालुक्यातील गिर्ये परिसरातील एका शिक्षिकेला ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून अज्ञात व्यक्तीने २५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. २४ सप्टेंबर रोजी सकाळी १०.४५ ते दुपारी १२.१५ या कालावधीत हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने फोन करून तुमच्या मोबाईलवरून भारत सरकारने बंद केलेली पॉर्न वेबसाईट सुरू करण्यात आली असून, तुम्हाला मुंबई सायबर क्राईम ब्रँचकडून अटक वॉरंट बजावण्यात आल्याचे सांगितले. त्यानंतर संशयिताने पीडितेला धमकावत तिची सर्व माहिती आमच्याकडे असून पोलिस ठाण्यात यावे लागेल, तसेच एक लाख रुपये दंड आणि एक वर्षाचा कारावास होईल, असे सांगितले.
यानंतर संशयिताने पीडितेच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर अश्लील फोटोसह संदेश पाठवला. त्यानंतर व्हिडिओ कॉल करून बदनामीची धमकी देत पैसे उकळण्यास सुरुवात केली. संशयिताने वेगवेगळ्या क्रमांकावरून संपर्क साधत २५ हजार रुपयांची मागणी केली. भीतीपोटी पीडितेने संशयिताने दिलेल्या खात्यावर एकूण २५ हजार रुपये पाठवले. मात्र काही वेळाने पुन्हा पैशांची मागणी सुरू झाल्यानंतर आपली ऑनलाइन फसवणूक होत असल्याचे पीडितेच्या लक्षात आले. तिने तत्काळ फोन कट करून विजयदुर्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात संशयिताविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (क), ६६ (ड), ६७ (अ), भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८ (४), ३१९, ७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
अधिक तपास विजयदुर्गचे पोलीस निरीक्षक दत्ता भोसले व पोलीस हवालदार प्रशांत जाधव करीत आहेत. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, पोलिस, सीबीआय, सायबर क्राईम किंवा बँक अधिकारी असल्याचे सांगून फोन अथवा व्हिडिओ कॉल करणार्या अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये. अटक किंवा गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून पैसे मागितल्यास कोणतीही रक्कम पाठवू नये. तसेच ओटीपी, यूपीआय पिन, बँक खात्याची माहिती किंवा वैयक्तिक कागदपत्रे अनोळखी व्यक्तींना देऊ नयेत. सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करावी. असे आवाहन विजयदुर्ग पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.