loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड तालुका कुणबी कर्मचारी संघातर्फे नेत्र तपासणी शिबिर संपन्न

खेड, (प्रतिनिधी)- खेड तालुका कुणबी कर्मचारी संघ आणि इन्फिगो आय केअर हॉस्पिटल खेड यांच्या संयुक्त विद्यमाने इन्फिगो आय केअर हॉस्पिटल खेड येथे भव्य नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या नेत्र तपासणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी सल्लागार विलास धामणे, अध्यक्ष राजेंद्र चांदिवडे, सचिव श्रीकृष्ण खांडेकर, कार्याध्यक्ष शैलेश पराडकर, महिला प्रतिनिधी ऋतुजा चांदिवडे, ओबीसी वीजेएनटी कर्मचारी संघाचे अध्यक्ष सचिन गोवळकर, कोषाध्यक्ष संदीप घाणेकर, उपाध्यक्ष संजय जाधव आदी कुणबी कर्मचारी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. इन्फिगो आय केअरच्या डॉ. रिबेका इरोम सामान्य नेत्रसेवा व बाह्य रुग्णसेवा, त्याचप्रमाणे प्रतिनिधी ऋतिक तावडे उपस्थित होते. या शिबिरामध्ये डोळ्यांच्या आजाराविषयी तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे मोफत नेत्र तपासणी करण्यात आली व ऑपरेशन व चष्म्यांवर भरघोस सूट देण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg