ठाणे (प्रतिनिधी) : मुंबई उच्च न्यायालयाने Suomoto PIL No. 03 of 2023 अंतर्गत गठीत केलेल्या High Power Committee (HPC) च्या बैठकीत दिलेल्या निर्देशांनुसार ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी आणि वाढत्या हवा प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेने बांधकामस्थळांची तपासणी मोहीम करत ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागामार्फत शहरातील एकूण 80 बांधकामस्थळांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली असून, नियमांचे पालन न करणाऱ्या 68 बांधकामस्थळांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच, संबंधित बांधकामस्थळांवर एकूण 3 लाख 50 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेच्या अनुषंगाने शहरातील हवेची गुणवत्ता योग्य राखण्यासाठी Air (Prevention and Control of Pollution) Act, 1981 मधील कलम 31A अंतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने विविध मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २ नोव्हेंबर २०२३ रोजी दिलेल्या पत्राद्वारे एकूण 29 मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार ठाणे महानगरपालिका क्षेत्रात हवा प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
या मोहिमेअंतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाच्या प्रतिनिधींनी शहरातील विविध बांधकामस्थळांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांची तपासणी केली. बांधकामाच्या ठिकाणी निर्माण होणारी धूळ तसेच इतर प्रदूषक घटक हवेत पसरू नयेत, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे किंवा नाही, याची पाहणी करण्यात आली. बांधकामस्थळांवर धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना, नियमांचे पालन आणि प्रदूषण रोखण्यासाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेची तपासणी करण्यात आली. तसेच, मेट्रो आणि एमएमआरडीए या आस्थापनांच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून कापूरबावडी जंक्शन ते गायमुख या मार्गावरही पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान हवा प्रदूषण नियंत्रणासाठी निर्धारित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश संबंधित आस्थापनांना देण्यात आले आहेत.
महापालिकेच्या या तपासणी मोहिमेत नौपाडा-कोपरी, उथळसर, मुंब्रा, कळवा, माजिवडा-मानपाडा आणि वर्तकनगर या प्रभागांमध्ये विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. नौपाडा कोपरी उथळसर प्रभाग समिती क्षेत्रात 58 बांधकाम स्थळांना भेटी देण्यात आल्या त्यापैकी 52 जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात 3 बांधकाम स्थळांना भेटी देण्यात आल्या असून पैकी 2 जणांना, कळवा प्रभाग समिती क्षैत्रात 7 बांधकाम स्थळांना भेटी देण्यात आल्या असून 7 जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. तर माजिवडा मानपाडा, वर्तकनगर प्रभाग समिती येथे 12 बांधकाम स्थळांना भेटी देण्यात आल्या असून 7 जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या असून माजिवडा-मानपाडा आणि वर्तकनगर प्रभागात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ३ लाख 50 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. याप्रकारची तपासणी व कारवाईची मोहीम यापुढेही सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे मुख्य पर्यावरण अधिकारी विद्या सावंत यांनी नमूद केले.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.