loader
Breaking News
Breaking News
Foto

‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमासाठी चिपळूण तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न

खेर्डी, चिपळूण (संतोष पिलके) : चिपळूण पंचायत समिती येथे ‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ या उपक्रमांतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदवी रानडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेला पंचायत समिती सभापती सूर्यकांत नारायण खेतले, जिल्हा परिषद सदस्य पूजा शेखर निकम, गटविकास अधिकारी उमा शिवाजीराव घारगे-पाटील, आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यशाळेस तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विस्तार अधिकारी, आरोग्य सहाय्यक, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका, शिक्षक, ग्रामपंचायत अधिकारी आणि अंगणवाडी सेविका सहभागी झाले होते. कार्यशाळेत ‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ हा उपक्रम प्रभावीपणे राबविताना येणार्‍या अडचणी, त्यावरील उपाययोजना तसेच राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांमध्ये विविध विभागांचा सहभाग याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रात्यक्षिके आणि विविध उदाहरणांच्या माध्यमातून उपक्रमाची कार्यपद्धती समजावून सांगण्यात आली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg