loader
Breaking News
Breaking News
Foto

कांदळगावकरांच्या मार्गदर्शनाखाली विद्यमान नगराध्यक्ष सौ. वराडकर नळपाणी योजना पूर्ण करण्याची शाश्वती कशी देतात.: गटतेने महेंद्र म्हाडगुत

मालवण (प्रतिनिधी) - माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या कार्यकाळात तत्कालीन आमदार वैभव नाईक यांनी शहरातील समस्या जाणून घेत भुयारी गटार योजनेसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला होता. अतिरिक्त निधी आणण्याची ताकदही माजी आमदार नाईक यांच्यात होती. मात्र, सत्ताधार्‍यांच्या ढिसाळ कारभारामुळे ही योजना अपूर्ण राहिली. ज्या माजी नगराध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली भुयारी गटार योजना पूर्ण होऊ शकली नाही, त्याच कांदळगावकरांच्या मार्गदर्शनाखाली विद्यमान नगराध्यक्ष सौ. वराडकर नळपाणी योजना पूर्ण करण्याची शाश्वती कशी देतात, असा खरमरीत सवाल ठाकरे शिवसेनेचे गटनेते महेंद्र म्हाडगुत यांनी उपस्थित केला आहे. मालवण नगरपालिकेच्या नळपाणी योजनेच्या कामावरून विरोधक ठाकरे शिवसेना आणि सत्ताधारी यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबत सत्ताधारी शिंदे शिवसेनेतर्फे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी पत्रकार परिषदेद्वारे विरोधक हे चुकीच्या माहितीच्या आधारावर जनतेत गैरसमज पसरवीत असल्याचा आरोप केला होता. यावर ठाकरे शिवसेनेतर्फे नगरसेवक महेंद्र म्हाडगुत वं मंदार ओरसकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. माजी आमदार वैभव नाईक यांनी दूरदृष्टी ठेवून मालवण शहरासह कोळंब, कुंभारमाठ, वायरी, तारकर्ली, देवबाग आणि देवली या भागात पिण्याच्या पाण्याचा मुबलक पुरवठा व्हावा यासाठी निधी मंजूर करून दिला होता. मात्र, विद्यमान नगराध्यक्षांचा प्रभाग असलेला राजकोट भाग उंचावर आहे, तसेच कोतेवाडा भाग या नवीन नळपाणी योजनेपासून वंचित राहणार का, असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडला असल्याचे म्हाडगुत यांनी नमूद केले. दरम्यान, नळपाणी योजनेचे काम करणारा ठेकेदार व पी.एम.सी. योजनेची देखरेख योग्य प्रकारे करत असतील, तर मग निवडून आल्यापासून सभागृहात वारंवार मागणी करून आणि उपोषणास बसूनही या योजनेची सविस्तर माहिती देण्यासाठी विशेष सभा का बोलावली जात नाही, असा संतप्त सवाल नगरसेवक मंदार ओरसकर यांनी विचारला आहे.

टाईम्स स्पेशल

गेल्या दहा महिन्यांत सत्तेत असलेल्यांना या अत्यंत महत्त्वाच्या योजनेचा आढावा घ्यावासा का वाटला नाही? आढावा न घेतल्यामुळे ठेकेदाराकडून सुरू असलेल्या मनमानी कामाची जबाबदारी सत्ताधारी घेणार आहेत का, असा जाबही ओरसकर यांनी विचारला. जोपर्यंत ही योजना सुरळीत आणि व्यवस्थित पूर्ण होत नाही, तोपर्यंत शिवसेनेचे सर्व नगरसेवक आणि कार्यकर्ते ’जनतेचे सेवक’ म्हणून सत्ताधार्‍यांच्या अशा प्रत्येक चुकीच्या कारभारावर आणि कामावर अंकुश ठेवून राहतील, असा इशारा महेंद्र म्हाडगुत व मंदार ओरसकर यांनी दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg