loader
Breaking News
Breaking News
Foto

नामजोशी कॉलेज व माखजन ग्रामपंचायतीने दरवर्षी प्रमाणे बांधले बंधारे

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथे माखजन ग्रामपंचायत व माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या ॲड. पी. आर. नामजोशी कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी माखजन गावात कुंभारवाडीनजीक तीन बंधारे बांधले. माखजन ग्रामपंचायतीचे सरपंच महेश बाष्टे यांनी स्वतः बंधारा बांधताना खूप मेहनत घेतली.यावेळी अजीज आलेकर देखील उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

माखजन ग्रामपंचायत आणि नामजोशी कॉलेजचे विद्यार्थी यावर्षी दुष्काळी परिस्थिती आहे म्हणूनच नाही तर दरवर्षी भूजलं पातळी वाढण्यासाठी बंधारे बांधत असत. सध्या प्रत्येक गावात वनराई बंधारे बांधण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे दुष्काळी काळात देखील भूजलं पातळी टिकून राहण्यास मदत होणार आहे. माखजन येथील हे बंधारे बांधताना जिल्हा परिषदेची माखजन मराठी शाळेतील विद्यार्थी देखील उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

यावेळी नामजोशी कॉलेजचे प्रा. अभिजित सुर्वे, नोडल अधिकारी प्रदीप पाटील, सहाय्यक नोडलं अधिकारी सुनील लोंढे, केंद्र माखजन प्रमुख दत्ताराम गोताड, कासे केंद्र प्रमुख बी. व्ही. जानकर, माखजन हायस्कुल.. प्रत्येक वर्षी हे बंधारे बांधले जात असल्याने कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे व माखजन सरपंच महेश बाष्टे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg