loader
Breaking News
Breaking News
Foto

मुगिज येथे शेतकऱ्यांसाठी ‘अझोला निर्मिती व पशुखाद्य वापर’ प्रात्यक्षिक संपन्न

दापोली (सागर गोवळे) : बीजांकुर गटाच्या वतीने मुगिज येथे स्थानिक शेतकऱ्यांसाठी अझोलाची निर्मिती, वाढ, देखभाल आणि पशुधनासाठी पूरक खाद्य म्हणून त्याचा वापर या विषयावर विशेष प्रात्यक्षिकाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. कमी खर्चात व कमी जागेत अझोला तयार करून त्याचा पशुधनाच्या आहारात योग्य पद्धतीने वापर कसा करावा, याचे प्रत्यक्ष धडे यावेळी शेतकऱ्यांना देण्यात आले. ​प्रात्यक्षिकादरम्यान गोठ्याजवळ सुमारे ६ फूट × ३ फूट × १ फूट आकाराचा खड्डा खोदून त्यात ताडपत्री अंथरण्यात आली. त्यात ७ ते ८ इंच पाणी भरून ३ किलो शेणखत, ३ किलो माती आणि ३० ग्रॅम ‘सिंगल सुपर फॉस्फेट’ (SSP) यांचे मिश्रण पाण्यात मिसळण्यात आले. हे मिश्रण स्थिर झाल्यानंतर त्यात चांगल्या प्रतीचे अझोला कल्चर सोडण्यात आले. योग्य पाणी व्यवस्थापन व नियमित देखभाल केल्यास अझोलाची अत्यंत जलद वाढ होऊन उत्तम उत्पादन मिळते, हे प्रत्यक्ष दाखवून देण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​अझोलामध्ये प्रथिनांचे (Proteins) प्रमाण मुबलक असल्याने तो पशुधनासाठी अत्यंत पौष्टिक पूरक खाद्य ठरतो. तयार झालेला ताजा अझोला काढून स्वच्छ पाण्याने धुऊन नियमित चारा किंवा खाद्यामध्ये मिसळून जनावरांना कसा द्यावा, तसेच जनावरांच्या आवश्यकतेनुसार आहारातील अझोलाचे प्रमाण कसे ठरवावे, याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. अझोलाचा वापर पूरक खाद्यासोबतच जैवखत आणि हिरवळीचे खत म्हणूनही करता येतो, त्यामुळे ही पद्धत शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर असल्याचे सांगण्यात आले. इस प्रात्यक्षिकामुळे शेतकऱ्यांना अझोलाचे उत्पादन, संगोपन, काढणी, स्वच्छता आणि वापराबाबत थेट प्रात्यक्षिक ज्ञान मिळाले.

टाईम्स स्पेशल

​सदर प्रात्यक्षिक सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, रावे केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई, विषय विशेषज्ञ डॉ. नरेंद्र प्रसादे, कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण आणि डॉ. प्रवीण झगडे यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर करून कमी खर्चात पूरक पशुखाद्य तयार करण्याचा हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg