loader
Breaking News
Breaking News
Foto

सोवेलीत कृषी मेळावा उत्साहात संपन्न: स्थानिक वाण व जैवविविधता संवर्धनाचा जोरदार संदेश

दापोली (सागर गोवळे) - स्थानिक पीक वाणांचे जतन, जैवविविधतेचे संवर्धन आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने सोवेली (चव्हाणावाडी, हनुमान मंदिर परिसर) येथे ‘स्थानिक वाण व जैवविविधतेचे जतन प्रशिक्षण, कृषी प्रदर्शन व शेतकरी मेळावा’ अत्यंत उत्साहात पार पडला. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीच्या विविध विभागांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मेळाव्यात १५४ शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे राजेंद्र फणसे, कृषी महाविद्यालय दापोलीचे अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, सरपंच जयेश मानकर यांच्यासह विद्यापीठाचे नामवंत कृषी वैज्ञानिक व अधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉ. कुणकेरकर यांनी स्थानिक हवामानाशी जुळवून घेणाऱ्या पारंपरिक पीक वाणांचे जतन करण्याचे आवाहन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोकणातील भाताचे प्रसिद्ध वाण (रत्नागिरी, कर्जत, फोडाघाट, पालघर, कोकण सुवास) तसेच नाचणी, वरई (प्रोसो मिलेट), कारळा, मूग, तूर, चवळी, कुळीथ आणि भुईमूग यांसारख्या सुधारित वाणांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. RAWE गटांच्या (बीजांकुर-मुगीज, मृदगंध-सोवेली, कृषिकन्या-भाटघर, वसुंधरा-सोवेली) वतीने कोकण जलकुंड, पावसाच्या पाण्याचे संकलन, शून्य ऊर्जा शीतगृह, ठिबक सिंचन आणि एकात्मिक शेती पद्धती यांसारख्या तंत्रज्ञानावर आधारित सुंदर प्रतिकृती सादर करण्यात आल्या.

टाईम्स स्पेशल

शेतीतील श्रम व वेळ कमी करण्यासाठी कोनो/जपानी तणनियंत्रक, आंबा काढणी यंत्र, सुपारी व काजू फोडणी यंत्र तसेच विद्युत शक्तीवर चालणाऱ्या भात पुनर्लागवड यंत्राचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. काजू बाँड सिरप, आंबा व करवंद सिरप, जायफळ कँडी, कोकम आगळ, बांबू शिल्पे आणि अगरबत्त्या यांसारख्या प्रक्रियायुक्त उत्पादनांचे स्टॉल लक्षवेधी ठरले. तसेच युरिया ब्रिकेट्स, जीवामृत, पंचगव्य, ट्रायकोडर्मा आणि रायझोबियम यांसारख्या जैविक निविष्ठांची माहिती देण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg