खेड (प्रतिनिधी) - श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर, कॉलेज (सी.बी.एस.ई.) वेरळ येथे शनिवार दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी शालेय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले. या विज्ञान प्रदर्शनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी, पंचायत समिती खेड विजय करपे यांच्या हस्ते विद्येची आराध्य देवता सरस्वती देवीचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये गणित, विज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), रोबोटिक्स आणि कला अशा विविध विषयांवर आधारित विद्यार्थ्यांनी आकर्षक व नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले.
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वैज्ञानिक प्रतिकृती , गणितीय संकल्पना तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प , रोबोटिक्स मॉडेल्सच्या प्रदर्शनांनी शोभा वाढवली. या विज्ञान प्रदर्शनामध्ये इ.४ ती ते १२ वी च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग दाखविला. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्पांची माहिती उपस्थितांना आत्मविश्वासाने समजावून सांगितली. या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती, निरीक्षणशक्ती, कल्पनाशक्ती, संघभावना आणि वैज्ञानिक दृष्टिकोन दिसून आला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याची संधी मिळते. तसेच पालकांनी उत्स्फूर्त सहभाग दाखविला.
ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल मोरवंडे बोरज विज्ञान शिक्षक प्रतीक पवार व दामिनी महाजन यांनी विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षक म्हणून काम पाहिले. प्रमुख पाहुणे व परीक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून त्यांचा उत्साह वाढविला. यावेळी संस्थेचे संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे, संस्था उपाध्यक्षा सुप्रिया पाष्टे चेअरमन उदय शेटवे, खजिनदार दिग्विजय इंदुलकर, प्रशालेचे प्राचार्य डॉ.एस.एस.अली, सीईओ. विजय रॉबर्ट, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन मीनाक्षी आंब्रे यांनी केले.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.