देवगड (प्रतिनिधी) - विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या जंगलतोडीविरोधात आणि निसर्गसंपदेच्या संवर्धनासाठी देवगड तालुक्यातील मुणगे-सावंतवाडी येथे वृक्षप्रेमींनी एकजुटीचा आवाज बुलंद केला. गावातील तब्बल २५० वर्षांहून अधिक जुन्या वटवृक्षाभोवती मानवी साखळी तयार करून गोपुरी आश्रमाच्या वतीने जंगलतोडीच्या धोरणाचा तीव्र निषेध करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात टोरेंट वीज प्रकल्पासाठी सुरू असलेली जंगलतोड तसेच महाराष्ट्रातील विविध भागांत प्रस्तावित वीज प्रकल्पांमुळे उद्भवणाऱ्या पर्यावरणीय संकटाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी (३१ ऑक्टोबर) या अनोख्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. विकासाच्या नावाखाली निसर्गाचा ऱ्हास होत असताना पर्यावरण वाचविण्याची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे, हा संदेश या मानवी साखळीतून देण्यात आला. गावातील सुमारे अडीचशे वर्षांहून अधिक काळ साक्षीदार असलेल्या पुरातन वटवृक्षाभोवती जिल्हाभरातील वृक्षप्रेमी, पर्यावरणप्रेमी, महिला आणि ग्रामस्थांनी हातात हात घालून मानवी साखळी तयार केली.
या उपक्रमातून केवळ जंगलतोडीचा निषेध करण्यात आला नाही, तर निसर्गाचे अस्तित्व टिकविण्यासाठी सामूहिक जनजागृतीची गरजही अधोरेखित करण्यात आली. या वेळी गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, निवृत्त शिक्षणाधिकारी मोहन सावंत, आर्ट ऑफ लिव्हिंगचे उमेश वायंगणकर, नंदू पाटील, सिनेअभिनेते अभय खडपकर, अॅड. मनोज रावराणे, संतोष कांबळे, डॉ. विजयलक्ष्मी चिंडुक, काँग्रेसचे देवगड तालुकाध्यक्ष उमेश कलकर्णी, हिंदळे सरपंच मकरंद शिंदे, मुणगे येथील संयोजक अमित सावंत, अॅड. राखी मालवणकर, प्रमोद सावंत, विद्या सावंत, दिगंबर पेडणेकर, दशरथ मुणगेकर, राजश्री मुणगेकर, दक्षता मुणगेकर, अनिता बागवे, अश्विनी मेस्त्री, रघुनाथ मेस्त्री आदी मान्यवरांसह जिल्हाभरातील वृक्षप्रेमी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विकासाच्या नावाखाली शासनाकडून विविध प्रकल्प राबविताना मोठ्या प्रमाणात जंगलतोड केली जाते. त्यानंतर वृक्षलागवडीचे संकल्प जाहीर केले जातात. मात्र, प्रत्यक्षात या संकल्पांची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. जंगलांचे अस्तित्व टिकले तरच जैवविविधता टिकू शकते. ही बाब विकास प्रकल्प राबविताना लक्षात घेतली जात नसल्याची खंत गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी व्यक्त केली. कोकणासारख्या निसर्गसमृद्ध भागात विकासाच्या नावाखाली होणारी जंगलतोड भविष्यासाठी धोकादायक ठरू शकते, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
जंगलतोड, तापमानातील वाढ आणि बदलते हवामान यांचा मानवी आरोग्यासह संपूर्ण निसर्गचक्रावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे शासनाने जंगलतोडीच्या धोरणाचा गांभीर्याने पुनर्विचार करावा, अशी मागणी बाळू मेस्त्री यांनी केली. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जंगलांचे संरक्षण करणे ही काळाची गरज असून, विकास करताना निसर्गाचा विनाश होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. सुंदरलाल बहुगुणा यांच्या चिपको आंदोलनाप्रमाणेच जिल्ह्यातही जंगल वाचविण्यासाठी लोकचळवळ उभी राहिली पाहिजे. जंगलांचे संरक्षण ही केवळ काही पर्यावरणप्रेमींची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. सर्वांनी एकजुटीने जंगलांचे संवर्धन करून जैवविविधता टिकविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण रक्षणाची सामूहिक प्रतिज्ञा घेतली. पुरातन वटवृक्षाला साक्षी ठेवून जंगल वाचविण्याचा आणि निसर्गाचा समतोल राखण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. मुणगेतील या मानवी साखळीतून विकासापेक्षा निसर्गाचे अस्तित्व महत्त्वाचे असल्याचा ठाम संदेश देण्यात आला.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.