loader
Breaking News
Breaking News
Foto

सिद्धयोग लॉ कॉलेज दायित्वांतर्गत खेर्डी येथे शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात

खेर्डी : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला, विविध कौशल्यांना आणि सामाजिक बांधिलकी असलेला वकील म्हणून सुरू होणाऱ्या भविष्यातील वाटचालीला दिशा देण्याच्या उद्देशाने सिद्धयोग लॉ कॉलेज, खेड यांच्या वतीने 'सिद्धयोग दायित्व’ या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, खेर्डी येथे शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. सिद्धयोग लॉ कॉलेजच्या प्राचार्या प्रीती बोंद्रे यांच्या शैक्षणिक व सामाजिक दृष्टिकोनातून प्रेरणा घेत, ‘सिद्धयोग दायित्व’ या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचे कार्य ॲड. प्रा. दिलीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पुढे नेले जात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान, मार्गदर्शन आणि कायदेविषयक जागरूकता पोहोचविण्याच्या या उपक्रमातून महाविद्यालयाची सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमात अॅड. प्रा. दिलीप चव्हाण यांनी ‘अभ्यास कसा करावा?’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अभ्यासाचे नियोजन, सातत्य, वेळेचे व्यवस्थापन आणि ध्येय निश्चिती याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सिद्धयोग लॉ कॉलेजच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनी स्वाती नामजोशी यांनी विद्यार्थ्यांना सिद्धयोग लॉ कॉलेज तसेच महाविद्यालयाच्या विविध शैक्षणिक, कौशल्यविकास आणि सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. द्वितीय वर्षाचे विद्यार्थी तानाजी चव्हाण यांनी ‘मुलांची सुरक्षितता’ या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना सुरक्षित व सजग राहण्याचे आवाहन केले. तसेच अक्षय चव्हाण यांनी ‘आदर्श विद्यार्थी कसा असावा?’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाच्या शेवटी सिद्धी चाळके हिने आभार प्रदर्शन केले.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमास जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, खेर्डी येथील विद्यार्थी, शिक्षक तसेच उर्दू शाळा, खेर्डी येथील विद्यार्थी, मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याशिवाय परिसरातील काही सजग नागरिकांनीही कार्यक्रमास उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. शिक्षण केवळ वर्गखोलीपुरते मर्यादित न राहता समाजापर्यंत पोहोचले पाहिजे, या विचारातून राबविण्यात येणाऱ्या ‘सिद्धयोग दायित्व’ उपक्रमाच्या माध्यमातून सिद्धयोग लॉ कॉलेजने आपल्या सामाजिक बांधिलकीची आणखी एक सकारात्मक पायरी गाठली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg