loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई-गोवा महामार्गावर आंजणारी येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा रास्ता रोको उद्या होणार

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा तालुक्यातील आंजणारी, वेरळ, वाकेड या अपघात प्रवण क्षेत्रात सतत होणार्‍या अपघातामुळे वाहन चालक, प्रवाशी जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असुन या ठिकाणी योग्य उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. याच मागणीसाठी बुधवार २५ नोव्हेंबर रोजी आंजणारी येथे उबाठा पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे तालुका अध्यक्ष युवराज हांदे यांनी जाहीर केले आहे. मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम झाले असले तरी अनेक त्रुटी राहील्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांना खुप त्रास सहन करावा लागत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आंजणारी, वेरळ, वाकेड वळणावर सतत अपघात होत आहेत. काहींना जीव गमवावा लागला असून अनेकजण जखमी होण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना संबंधित प्रशासनाकडून करण्यात आलेलेली नाही. आवश्यक त्या उपाययोजनेचा मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हे आंदोलन करण्यात येत असून या आंदोलनात जनतेने मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका प्रमुख युवराज हांदे यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg