संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत अधिकारी माया गुरखे यांची तातडीने बदली करून त्यांच्या जागी पूर्णवेळ ग्रामपंचायत अधिकार्याची नियुक्ती करावी, अशी जोरदार मागणी डिंगणीतील ५९ ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत ग्रामस्थांनी पंचायत समिती सभापतींकडे लेखी निवेदन सादर केले असून, येणार्या तहकूब ग्रामसभेपूर्वी नवीन अधिकार्याची नियुक्ती न झाल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार, १७ नोव्हेंबर २०२६ रोजी डिंगणी ग्रामपंचायतीची ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. सकाळी १०.३० वाजता ग्रामसभा सुरू होणार असल्याने ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ वेळेत उपस्थित होते. मात्र, ग्रामपंचायत अधिकारी सकाळी १०.४० वाजता सभास्थळी दाखल झाल्या आणि अवघ्या दहा मिनिटांत म्हणजे १०.५० वाजता ग्रामपंचायत कार्यालयातून निघून गेल्या. त्यामुळे ग्रामसभा तहकूब झाल्याचे जाहीर करण्यात आले. या प्रकारामुळे उपस्थित ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली. डिंगणी गावाचा भौगोलिक विस्तार मोठा असून, ग्रामपंचायतीपासून काही किलोमीटर अंतरावर अनेक वाड्या-वस्त्या आहेत. ग्रामसभेला उपस्थित राहण्यासाठी ग्रामस्थांना वेळ आणि प्रवास खर्च करावा लागतो. अशा परिस्थितीत ग्रामसभा वेळेत न घेता अचानक तहकूब केल्यामुळे ग्रामस्थांचा वेळ वाया जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
ग्रामपंचायत अधिकारी रुजू झाल्यापासून आजपर्यंत ग्रामसभेत कोणत्याही आर्थिक व्यवहाराचा सविस्तर हिशेब ग्रामस्थांसमोर मांडण्यात आलेला नाही. मागील ग्रामसभांचे इतिवृत्तही वाचून दाखवले जात नसल्याने ठरावांच्या कार्यवाहीबाबत पारदर्शकता राहत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांची मते विचारात घेतली जात नाहीत तसेच त्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली जात नसल्याची तक्रारही निवेदनातून करण्यात आली आहे. ग्रामपंचायत अधिकारी सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांना आपले म्हणणे मांडण्याची पुरेशी संधी देत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच अधिकारी कार्यालयात अनुपस्थित राहत असल्याने नागरिकांची महत्त्वाची कामे रखडतात. ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित असतानाही अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे विविध कामांसाठी ग्रामस्थांना वारंवार कार्यालयाच्या फेर्या माराव्या लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ग्रामसभा सचिव म्हणून ग्रामपंचायत अधिकार्यांची जबाबदारी असतानाही ग्रामसभेचे इतिवृत्त लिहिण्याची वेळ ग्रामस्थांवर येत असल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तसेच अंगणवाडी सेविकांच्या नियुक्तीसारख्या विषयांमध्येही आवश्यक प्रक्रियेबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तात्पुरत्या स्वरूपात सचिव म्हणून नियुक्त केलेल्या व्यक्तींना आवश्यक अधिकार नसल्याने ग्रामस्थांच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याचेही सांगण्यात आले आहे.
डिंगणी गाव मोठे असल्याने येथे स्वतंत्र आणि पूर्णवेळ ग्रामपंचायत अधिकारी असणे आवश्यक आहे. त्यामुळे सध्याच्या ग्रामपंचायत अधिकारी माया सब्बाराम गुरखे यांची तातडीने बदली करून त्यांच्या जागी पूर्णवेळ पुरुष ग्रामपंचायत अधिकार्याची नियुक्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या निवेदनावर एकूण ५९ ग्रामस्थांनी सह्या केल्या आहेत. निवेदन देताना माजी ग्रामपंचायत सदस्य सुदर्शन मोहिते, शिवसेना कार्यकर्ते सुधीर चाळके, माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष वामन काष्टे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष समीर खान, युवराज खाडे, रमेश काजरेकर, मनोहर सोलकर, गणपत पाकतेकर यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. तहकूब ग्रामसभेपूर्वी नवीन अधिकार्याची नियुक्ती करावी, अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे डिंगणी ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत केलेल्या तक्रारींची पंचायत समिती प्रशासन कितपत दखल घेते आणि बदलीच्या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.