loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हा परिषद शाळा आगवे रायकरवाडीच्या पालकांच्या श्रमदानातून दोन विजय बंधारे बांधण्यात आले

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - भूजल पातळीत वाढ होणे, शेती आणि उन्हाळ्यातील पाणी टंचाईपासून सुटका करून, जलसंधारणाला चालना देण्यासाठी, पाणी अडवून -जिरवून जीवन समृद्ध करण्यासाठी मिशन बंधारे अभियानांतर्गत शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी आगवे ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद आगवे रायकरवाडी शाळा, शाळा व्यवस्थापन समिती, अंगणवाडी, पालक बंधूभगिनी यांच्या श्रमदानातून अनंत रायकर गावप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सिद्धिविनायक मंदिराच्या खालच्या बाजूला पाण्याच्या विहिरीजवळ खांडकी या ठिकाणी दोन विजय बंधारे बांधण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी लांजा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रशांत सोनावले, माजी गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग, सापुचेतळे केंद्रीय प्रमुख स्नेहाजी कीर यांनी भेट दिली. यावेळी सोनावले व सावंग यांनी पालकांचे सहकार्य पाहून समाधान व्यक्त केले. शिवाय सर्वांना मनःपूर्वक धन्यवादही दिले. स्नेहालय कीर यांनीही सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद दिले. तसेच यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा रश्मी राजेश सनगरे, उपाध्यक्षा अनामिका ज्ञानेश्वर आग्रे, सदस्य - मधुरा मारुती रायकर, सुप्रिया निलेश रायकर, शालिनी कैलास रायकर, आरोहि नितीन रायकर,पालक- सिद्धी संदिप रायकर, संजना शंकर रायकर,राजेश दत्ताराम सनगरे, प्रमोद शिवराम रायकर, शंकर महादेव नमसले,सिताराम तानू रायकर, देऊ हरी धडम, शाळेचे मुख्याध्यापक मकरंद लिंगायत, उपशिक्षक अमेय बाळकृष्ण जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले. शाळेचे मुख्याध्यापक मकरंद लिंगायत यांनी सर्वांचे मनस्वी धन्यवाद मानले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg