loader
Breaking News
Breaking News
Foto

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर संजू परब; नुकसानीची केली पाहणी

सावंतवाडी : सध्या निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले असून, या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी व झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली. झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाकडून मिळवून देण्यासाठी तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक भाई केसरकर आणि कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून आवश्यक पाठपुरावा करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन संजू परब यांनी यावेळी दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर, पंचायत समिती सभापती सुष्मिता जाधव, गटनेते शरद धाऊसकर, पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा, उत्कर्षा गावकर, प्रणाली टिळवे, युवासेना तालुकाप्रमुख क्लेटस फर्नांडिस यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते. दुष्काळामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने मदत मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही यावेळी संजू परब यांनी दिली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg