loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वर तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत कसबा हायस्कूलचे मुला-मुलींचे संघ अजिंक्य

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी, कसबा संचलित न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, कसबा- संगमेश्वर या विद्यालयाच्या १९ वर्षांखालील मुलांच्या आणि मुलींच्या खो-खो संघांनी तालुकास्तरीय स्पर्धेत दिमाखदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. दोन्ही संघांनी स्पर्धेतील सर्व सामने जिंकत अजिंक्यपद मिळविल्याने विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशस्वी परंपरेत आणखी एका मानाचा तुरा रोवला गेला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी न्यू इंग्लिश स्कूल, देवरूख येथे १९ वर्षांखालील वयोगटातील तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कसबा हायस्कूलच्या मुलांच्या आणि मुलींच्या संघांनी सहभाग घेतला होता. दोन्ही संघांनी उत्कृष्ट सांघिक समन्वय, चपळाई, कौशल्य आणि जिद्दीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. स्पर्धेतील सर्व सामने जिंकून दोन्ही संघांनी प्रथम क्रमांक मिळवित तालुक्यात आपले वर्चस्व सिद्ध केले. या यशामुळे आता कसबा हायस्कूलचे मुलांचे आणि मुलींचे दोन्ही संघ जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत संगमेश्वर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

टाईम्स स्पेशल

विद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी व सदस्य, पालकांनी यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. तसेच आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या. तालुकास्तरावर मिळविलेल्या या यशानंतर जिल्हास्तरीय स्पर्धेतही कसबा हायस्कूलचे दोन्ही संघ दमदार कामगिरी करतील, असा विश्वास क्रीडाप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg